Gulabrao Patil & Chandrakant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील यांचा गुलाबरावांना घऱचा आहेर!

MLA Chandrakant Patil criticized Administration on Bodwad water scheme-विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारे बोदवड पाणीपुरवठा योजनेवरून केले थेट टिकेचे लक्ष्य

Sampat Devgire

Muktainagar News : मुक्ताईनगर मतदारसंघातील प्रतिष्ठेची बोदवड ५१ गावे पाणीपुरवठा योजना सातत्याने चर्चेत राहिली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेच पालकमंत्री असल्याने त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र त्यांचे सहकारी आमदार चंद्रकांत पाटील यांनीच या योजनेवरून त्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. (Bodwad 51 villages water scheme discussed in assembly)

मुक्ताईनगर (Jalgaon) मतदारसंघातील बोदवड पाणीपुरवठा योजनेवरून (Water supply) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रशासनावर टिका केली आहे. ही टिका अप्रत्यक्षपणे या खात्याचे मंत्री व जळगावचे पालकमंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर असल्याने तो चर्चेचा विषय आहे.

आमदार पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर चर्चा करतांना त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या योजनेचा ग्रामस्थांना लाभ होताना दिसत नाही. ही योजना केवळ कागदावर पूर्ण झाली आहे. बोदवडवासीयांची तहान या योजनेने भागलेली नाही. त्यामुळे ही योजना वाढीव करणार आहात का? बोदवडवासियांना दररोज पाणी देण्यासाठी आपण संवेदनशील आहात का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

ही योजना १ जानेवारी २०१८ ला पुनर्जीवित होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले, परंतु या योजनेत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा कुठलाही सारासार विचार न करता माणसी ४० लिटर पाणी देण्याची तरतूद करण्यात आली, तसेच पाणीपुरवठा यांत्रिकी विभागात देखील अनेक त्रुटी आणि अडचणी राहिल्या आहेत.

या पाणीपुरवठा योजनेत असंख्य त्रुटी आहेत. त्यातील अडचणींचा सारासार विचार संबंधित विभागाने केलेला नाही. त्रुटी असलेली योजना तयार करून ती कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हेतू दिसतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण होऊन ५ वर्षे उलटूनही जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही, अशी नाराजी पाटील यांची होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT