Swabhimani Shetkari Sanghatana : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता 'स्वाभिमानी'तही फूट पडणार?; तुपकरांच्या हाती बंडाचे निशाण

Ravikant Tupkar On Raju Shetty : फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही..
 Ravikant Tupkar, Raju Shetty
Ravikant Tupkar, Raju Shetty Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana Political News: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविषयी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

"फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही, त्यासाठी खांदा इमानदार आणि खानदानी असावा लागतो," असा टोला तुपकरांनी शेट्टी यांचे नाव न घेता लगावला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक काल (ता.२)बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे झाली. या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तुपकरांनी त्यांच्या मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.

 Ravikant Tupkar, Raju Shetty
Raj Thackeray On Nitin Desai Death : '' ही वेळ त्यांच्यावर कशामुळे आली...'' ; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंची मोठी मागणी

मी कुणाशीही खेटायला तयार...

नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. ज्याच्यासोबत आपण राहतो त्याने जर केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, परंतु मी आत्महत्या करणार नाही. संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, संघटना कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली, त्यामुळे संघटना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, असे जाहीर करत तुपकरांनी शेट्टींच्या विरोधात बंडाचे निशाण तर फडकविले नाही,अशी चर्चा आहे. "कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे," असे तुपकरांनी सांगितले.

'सदाभाऊंना बाजूला करू नका' असे मी त्यांना...

"२०१४ ला निवडणुकीसाठी आधी तयारी करायला आणि नंतर थांबायला सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून 'महामंडळ' देण्याचा शब्द दिला.सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाद झाले त्यावेळी सदाभाऊंना बाजूला करू नका, असे मी त्यांना सांगितले. मात्र त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. त्यांच्या शब्दाखातर मी राजीनामा दिला," असे तुपकर म्हणाले.

 Ravikant Tupkar, Raju Shetty
Pradeep Kurulkar Case: हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ.प्रदीप कुरुलकरांचा जामिनासाठी अर्ज; ९ ऑगस्टला होणार सुनावणी

हा काय प्रकार आहे..

"२०१९ ला राजू शेट्टींनी मला लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितले, मात्र युतीमुळे तेव्हाही माघार घेतली. विधानपरिषद मिळेल, असे आघाडीत ठरले, मात्र राजू शेट्टींचा पराभव झाला आणि विधानपरिषदेसाठी शेट्टींचे नाव पुढे आले. आता रविकांत तुपकर हेच लोकसभेचे उमेदवार, असे शेट्टी सांगत असले तरी ते बुलढाणा जिल्ह्यात येतात आणि आम्हाला सांगत नाही? हा काय प्रकार आहे.? दौऱ्याची कल्पना आम्हाला का दिली जात नाही,? असा प्रश्न तुपकरांनी उपस्थित केला.

नव्या दमाची फौज उभी करणार ..

"आम्हाला संपविण्याचा जो कुणी प्रयत्न करेल त्याला 'ईट का जबाब पत्थर से देंगे'" असा इशारा तुपकरांनी दिला. "आमची ताकद केवळ बुलडाण्यात नाही, ज्या जिल्ह्यात पाऊल ठेवू त्या जिल्ह्यात ताकद निर्माण करू. राज्यभर शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या मागे उभं राहणार.., आता राज्यभर मोठी आणि नव्या दमाची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत तुपकरांनी बंडाचे निशाण हाती घेतल्याचे दिसते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com