जळगाव : मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस (ncp) अन् शिवसेनेत (shivsena) जुंपली आहे. त्यांच्यातील शाब्दिक 'वॅार' पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पोस्टवरुन शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर धावून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रोहिणी खडसेंवर (Rohini Khadse) खळबळजनक आरोप केले आहेत. ''एकनाथ खडसे आणि रोहणी खडसेंकडून माझ्या जीवाला धोका आहे, '' असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चां रंगल्या आहेत.
याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले, ''याप्रकरणी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या गाडीच्या चालकाने संबधित महिलेला शिवीगाळ केली आहे. या आमदाराचे अवैध व्यवसाय आहे. ते टोलवर बेकायदा पैसे वसुल करीत असतात. याबाबत आम्ही वेळोवेळी पोलिस अधिक्षकांना याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना संताप येणे स्वाभाविक आहे. त्यांना महिलांबाबत अत्यंत वाईट शब्दात संभाषण केलेले आहे. याबाबतच्या दोन आँडिओ क्लिप मी दिल्या आहेत. आणखी दोन क्लिप देणार आहे. हा आमदार शिवसेनेचा नाही. ते अपक्ष आहे. त्यांना राष्ट्रवादीन पाठिंबा दिल्याने ते आमदार झाले आहेत. त्यांचे अवैध व्यवसाय बंद झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत.
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. ''एकनाथ खडसे आणि रोहणी खडसेंकडून माझ्या जीवाला धोका आहे, '' असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चां रंगल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मतदारसंघातील महिला सुरक्षित नसल्याचे टि्वट केले आहे. त्यांनी वेळेप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटलांना चोप देण्याची भाषा केली. तर आमदार पाटील यांनी खडसे पिता- पुत्रीकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली.
बोदवड नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुक्ताईनगर मतदारसंघात हा वाद पेटला आहे. समाजमाध्यमांवर राष्ट्रवादीने केलेल्या पोस्टमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिलेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेचे पती राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी असून त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली होती. त्याचा राग आल्याने शुक्रवारी (ता.२४) रात्री १०.२२ वाजता ईश्वर हटकर याने महिलेच्या पतीला फोन करून धमकी दिली. रात्री १०.३० वाजता ईश्वर हटकर हा घरासमोर येऊन मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. ‘आम्ही आमदार चंद्रकांत पाटलांचे माणसे आहोत’ असे म्हणते महिलेचा विनयभंग केला. त्याच वेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील त्याठिकाणी आला आणि खडसेंच्या नावाने शिवीगाळ करून ‘ईडी’चे २ कोटी कुठे गेले असे म्हणू लागला.
''बोदवड निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे काही पदाधिकारी माझ्या अंगावर धावून आले होते. मात्र, ॲड. रवींद्र पाटील पुढे आल्याने मी बचावले. सोशल मीडियात कुणी काय पोस्ट करावे हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आमच्या विरोधातही अनेक पोस्ट येत असतात. एखाद्या महिलेवर भर रस्त्यावर अन्याय होत असेल तर यापुढे महिला शांत बसणार नाही,'' असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.