MLA Dilip Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dilip Bankar Politics: आमदार दिलीप बनकर म्हणतात, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे काम पारदर्शिच!

MLA Dilip Bankar; Pimpalgaon Baswant APMC is a farmers' organization, we are committed to its development -पिंपळगाव बसवंत बाजार समितीने ६२ कोटींच्या कामांच्या निविदांचा कोणताही वाद नाही असे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले.

Sampat Devgire

Dilip Bankar News: पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ६२ कोटींच्या कामांच्या निविदा विश्वासात न घेता काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपांबाबत सभापती, आमदार दिलीप बनकर यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी शेड बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये टोमॅटो लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी विविध विकास कामे प्रस्तावित आहेत. त्याबाबत अद्याप पर्यंत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आहेत. बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. ती पारदर्शी आणि उत्तम प्रकारे चालावी यासाठी आमचे प्रयत्न असतात. यामध्ये कोणतेही राजकारण न आणता काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधक सध्या कोणताही मुद्दा नसल्याने समितीच्या कामकाजात अडथळे कसे आणता येतील याचा विचार करतात. एक गोष्टीत राजकारण आणल्यामुळे ते सतत काही ना काही विपरीत चर्चा घडवीत असतात. आम्ही मात्र या तथ्यहीन चर्चा आणि आरोपांना कोणतेही महत्त्व देत नाही.

बाजार समितीत ६२ कोटींच्या कामाच्या कोणत्याही विषयाला मान्यता मिळालेली नाही. मिळाल्यानंतर ठराव मंजूर झाल्यावर त्यावर पुढील प्रक्रिया होते. जाहीर निविदा काढल्या जातात. त्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. विरोधी संचालक मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे सध्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची संस्था सतत पुढे कशी जाईल यासाठी आम्ही काम करीत आलो आहे. याबाबत कोणतेही काम प्रस्तावित असले तरी संचालक मंडळावर चर्चा करून त्याला मान्यता घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही होते. एकदा प्रक्रिया पार पाडताना स्पर्धात्मक विचार करून किमान दर असलेल्या निवेदनाच मान्यता दिली जाते.

बाजार समिती ही सहकारी आणि शेतकऱ्यांची संस्था आहे. क्षेत्रातील हजारो शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. यांच्या सुविधा आणि सोयींसाठी संचालक मंडळ सतत कार्यशील आहे. कामकाज पारदर्शी पद्धतीने होते आहे.

विरोधी गटाच्या संचालकांकडून मात्र केवळ राजकारण केले जात आहे. कोणत्याही निविदा प्रसिद्ध केलेल्या नसताना विरोध साप साप म्हणून भुई पडवत आहेत. त्यासंदर्भात आम्हाला कोणत्याही संस्थेचे कोणतेही पत्र देखील आलेले नाही. विरोधकांचा सभासदांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न अजिबात यशस्वी होणार नाही.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT