Ozar Politics News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम ओझर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांना भाजपच्या यतीन कदम या भावानेच पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. कदम यांच्यातील भाऊबंदकीचे राजकीय संघर्ष या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कदम बंधूंनी हीच भाऊबंदकी राजकारणात आणली होती. त्याचा फटका माजी आमदार अनिल कदम यांना बसला. गेल्या काही निवडणुकांमध्ये या भाऊबंदकीने ओझरच्या राजकारणाला संघर्षाचे स्वरूप आणले आहे.
या भाऊबंदीचे राजकीय सोने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार दिलीप बनकर यांनी लुटले. यंदाही कदम यांच्या ईर्षामुळेच भाजप आणि अजित पवार पक्षातील महायुती फिसकटली आहे. त्यामुळे ओझरच्या पहिल्या नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळेल.
या लढाईतील पहिला धक्का यतीन कदम यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला दिला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक शितल कडाळे आणि प्रकाश महाले यांनी भाजप प्रवेश केला. माजी नगरसेवक अपक्ष (कै) सुखदेव चवरे यांचे चिरंजीव दिनेश यांनीही भाजप प्रवेश केला.
निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. मात्र दोन्ही कदम आपले पत्ते ओपन करण्यास तयार नाहीत. दोघांनीही आपली रणनीती गुप्त ठेवल्याने अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या निवडणुकीतील राजकीय चुरस दिवसेंदिवस वाढत आहे.
माजी आमदार अनिल कदम आणि यातील कदम हे दोघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यातील भाऊबंदीच्या वादाच्या मुळात राजकारण आहे. गेली वीस वर्षे ओझरचे नागरिक आणि समर्थक या भाऊबंदकीचे साक्षीदार आहेत.
यतीन कदम यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये आमदार अनिल कदम यांना विरोध केला. त्याचा फायदा विधानसभेला आमदार दिलीप बनकर यांना झाला.त्यामुळे कदम बंधूंच्या नातेवाईक आणि समर्थकांना हा वाद संपुष्टात यावा अशीही इच्छा, व्यक्त होत आहे.
यंदा मात्र थेट कदम यांच्या घरातील आणि गावातील निवडणुका आहे. कदम यांच्या भाऊबंदीचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर उचलण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तिसरा पॅनेल स्वबळावर उतरवणार आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोणाचा लाभ होतो, हा नवा गंभीर अँगल ओझर नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीला आला आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.