Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंनी भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्याकडे ओढलं, अमरिशभाई पटेलांच्या बालेकिल्ल्याला तडा

Amrishbhai Patel Shirpur Politics : शिरपूर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आहे. भाजपच्या नाराज नेते व पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊन अमरिशभाई पटेलांना धक्का दिला आहे.
Eknath Shinde, Amrishbhai Patel,
Eknath Shinde, Amrishbhai PatelSarkarnama
Published on
Updated on

Dhule Shirpur Politics : धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुक रणधुमाळीपूर्वीच सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानेच ऑपरेशन धनुष्यबाण राबवत भाजपला मोठा हादरा दिला असून येथील भाजपचे नेते अमरिशभाई पटेलांच्या बालेकिल्ल्याला तडा गेला आहे.

भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आहे. भाजपचे माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी असे सगळे मिळून शंभरावर पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार (कै.) प्रल्हादराव पाटील यांचे नातू, माजी नगरसेवक तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष हेमंत पाटील, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते मोहन पाटील यांचे पुत्र तथा बाजार समितीचे संचालक प्रसाद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती वसंत पावरा, माजी नगरसेवक राजेंद्र गिरासे, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष विकी चौधरी, हेमराज राजपूत, सुनील धनगर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन शिरपूरमध्ये भाजपला जोर का झटका दिला आहे.

Eknath Shinde, Amrishbhai Patel,
BJP Politics : कांदे की भुजबळ कोणाचा हात धरावा? नांदगावात भाजप पुढे मोठा पेच

शिरपूर तालुक्यावर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व आहे. मात्र त्यांचे नेतृत्व झुगारून भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे शिरपूर शहर आणि तालुका भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले हे माजी नगरसेवक अचानक शिवसेना शिंदे गटात प्रवेशित झाल्याने ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हादरा बसला आहे.

Eknath Shinde, Amrishbhai Patel,
Sharad Pawar : मनावर दगड ठेऊन शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांसोबत चालला, म्हणे पक्ष सोडताना दुःख..

शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या माध्यमातून तसेच जिल्हाप्रमुख सतिष महाले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, तालुकाध्यक्ष दीपक जमादार, कन्हय्या चौधरी, शहरप्रमुख मनोज धनगर आदी उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात हे पदाधिकारी कोणती भूमिका घेतात यावरुन पुढील समीकरणे ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com