Dilip Bankar Latest Marathi News
Dilip Bankar Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार दिलीप बनकर यांना शिंगवेच्या मतदारांनी नाकारले!

Sampat Devgire

निफाड : निफाड (Niphad) तालुक्यात प्रतिष्ठेच्या शिंगवे (Niphad) विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत (Cooperative) शहाजी डेर्ले व गोकुळ गिते यांच्या नेतृत्वाखालील जय मल्हार पॅनलने विरोधकांना धुळ चारली. या पॅनेलने एकहाती विजय मिळवत सर्व तेरा जागांवर कब्जा केला. या निवडणुकीत आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी वैयक्तिक लक्ष घातले होते. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. (NCp MLA Dilip Bankar defeated by local leaders)

‘जय मल्हार’ पॅनेलच्या समर्थकांनी जल्लोष केला. शिंगवे सोसायटीची वेगळी ओळख जपण्यासाठी ‘जय मल्हार सहकार पॅनल’ची निर्मिती झाली होती. सोसायटीच्या सभासदांनी पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या बाजुने कौल दिला. पॅनलचे नेते श्री. डेर्ले व गिते यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले. (Dilip Bankar News)

ही निवडणूक बिनविरोधसाठी ज्येष्ठ नेत्यांसह श्री. डेर्ले व गिते यांनी प्रयत्न केले. मात्र विरोधकांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. जय मल्हार पॅनेलने प्रचारात आघाडी घेतल्यावर आमदार बनकर यांनी निवडणुकीत व्यक्तीशः लक्ष घातले. त्यांनी विविध मतदार तसेच कार्यकर्त्यांना फोन करुन मतदानाचे आवाहन केले. परंतु, जय मल्हार पॅनलच्या अतिशय प्रभावी प्रचार व मतदारांशी संपर्क यामुळे त्यांना यश आले. आमदार दिलीप बनकर यांचे समर्थन असलेला एकही उमेदवार निवडून आला नाही.

ही निवडणूक स्थानिक नेते शहाजी डेर्ले व गोकुळ गिते यांच्या नेतृत्त्वाची कसोटी पाहणारी होती. पॅनलचे उमेदवार निवडुन आणण्यासाठी माजी सरपंच प्रभाकर रायते, रतन गिते, रामदास गिते, साहेबराव डेर्ले आदिनीं परिश्रम घेतले

यामुळे झाला एकतर्फी विजय

पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे माजी संचालक गोकुळ गिते यांनी संपूर्ण राजकीय कसब पणाला लावत पॅनल निर्मिती केली. पॅनलमध्ये ज्येष्ठांना स्थान दिले. नवीन उमेदवारांना संधी देताना ज्येष्ठ व नव्यांचा मेळ बसविला. शहाजी डेर्ले यांनी निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांचा पराभव केला.

उमेदवारांना मिळालेली मते

गोकुळ गिते - ४४३ ,शहाजी डेर्ले -४३३,सुभाष कोरडे-३६३,प्रवीण डेर्ले -४००,रंभाजी डेर्ले - ४३५,विलास डेर्ले - ३८९,संजय मोगल -३७८,सोपान रायते -४२३,जगन शिंदे -३७८, राजाभाऊ सानप-४०३, सीनाबई डेर्ले -३९०,सिंधुबाई डेर्ले - ४३९, सुभाष कटारे- ४२३.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT