Dilip Borse, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dilip Borse Politics: आमदार दिलीप बोरसे म्हणतात, "मी तुतारी कशाला घेऊ, भाजप माझा डीएनए"

MLA Dilip Borse Politics, BJP is my DNA, will never join NCP Sharad Pawar-भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांनी पक्षांतराच्या चर्चेला दिला पूर्णविराम, भाजपच्या उमेदवारीबाबत ठाम असल्याचे सांगितले.

Sampat Devgire

Dilip Borse News: भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप बोरसे लवकर तुतारी हाती घेतील, अशा बातम्या होत्या. त्यामुळे बागलाण मतदार संघात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बोरसे यांनी स्पष्टच सांगितले आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांमध्ये राजकीय हालचाली गतिमान आहेत. या संदर्भात बागलान मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या पक्षांतराविषयी वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या. त्यामुळे मतदारसंघातील समीकरणांबाबत प्रस्थापित नेत्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या.

या संदर्भात आमदार बोरसे यांनी स्पष्टच सांगितले आहे. ते म्हणाले मी १९९० पासून भाजपचा कार्यकर्ता आहे. त्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्या फोटोंना पाहून आदिवासी मतदार काँग्रेसला मतदान करत होते.

त्यावेळेस आम्ही काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात राजकारण केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांची आणि विचारधारेशी आमची नाळ जुळली आहे. सबंध बोरसे कुटुंबीय भारतीय जनता पक्षाच्या राजकीय विचारधारेची बांधलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अथवा अन्य कोणताही भाजप विरोधक यांच्याशी आम्ही एकोपा करू शकत नाही. ते आमच्या रक्तातच नाही. आम्ही अशा पक्षात गेल्यास आमच्या वैचारिक कोंडमारा होईल.

भाजप हा माझा डीएनए आहे. त्यामुळे हा पक्ष सोडून अन्यत्र कुठे जाण्याचा विषयच येत नाही. यासंदर्भात ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांची कीव येते. त्यांना आमदार बोरसे कुटुंबीयाची राजकीय विचारसरणीची अजिबात माहिती नाही, असे स्पष्ट दिसते.

बागलाण मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडे अन्य काही इच्छुक उमेदवार चर्चेत आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे देखील विधानसभेच्या उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. कळवण हा डॉ पवार यांचा मतदार संघ आहे. तो शेजारीच आहे.

भाजपचे काही कार्यकर्ते डॉ पवार या उमेदवार असतील, असे बोलतात. यावर देखील आमदार बोरसे यांनी मतप्रदर्शन केले. ते म्हणाले, आम्ही बागलाणमध्ये भाजप हा पक्ष गावागावात पोहोचवला आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला आम्ही शंभर टक्के आमदार म्हणून विजयी करू.

भाजप ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या विजयाबाबत काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे माजी खासदार डॉ पवार असो व अन्य कोणी भाजपने उमेदवारी दिल्यास आम्ही त्या उमेदवाराचे काम मनापासून करू. त्याविषयी कोणताही संशय घेतला जाऊ शकत नाही.

मतदारसंघात भारतीय जनता पक्षात विद्यमान आमदार बोरसे यांना पक्षातूनच स्पर्धक तयार झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून देखील याबाबत चर्चा घडविली जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी देण्यावरून वाद होईल का? याचे स्पष्टीकरण देखील आमदार बोरसे यांनी दिले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT