Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Disqualification Case : ठाकरेंचा थयथयाट, तर पवारांचे राजकारण उघडे पडले; मंत्री विखेंचा मार्मिक टोला

Radhakrishna Vikhe Patil: मंत्री राधाकृष्ण विखे यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका

Pradeep Pendhare

Ahmednagar News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. या निकालामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदारच असल्याचे सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. सत्ता असताना आणि गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचा सुरू असलेला थयथयाट या निकालाने आणखी उघडा पडला तर शरद पवार यांचे सत्तेचा डाव मांडून पाठीत खंजीर खुपसायचे राजकारण उघडे पडल्याचा टोला विखे यांनी लगावला.

राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी शिवसेना कोणाची आणि आमदार अपात्रेच्या प्रकरणावर निकाल दिला. अध्यक्ष नार्वेकर यांनी निकालाचे वाचन करताना मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना असल्याचे म्हटले. तसेच दोन्ही गटाकडील आमदार पात्र असल्याचा निकाल दिला.

या निकालाचे पडसाद देशात आणि महाराष्ट्रात उमटू लागले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सर्व शिलेदार आमदारांचे अभिनंदन केले. यानंतर मंत्री विखे यांनी या निकालावर मार्मिक प्रतिक्रिया दिली. 'हा निकाल म्हणजे, राज्यासह देशाच्या राजकारणात आगामी काळात दिशादर्शक आणि महत्त्वाची भूमिका बजावेल', असे मंत्री विखे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री विखे म्हणाले, 'हा निकाल देताना नोंदवलेली निरीक्षण खूप म्हत्वपूर्ण आहेत. या निकालाचा अभ्यास केल्यास उद्धव ठाकरे उलट तपासणीला सुद्धा सामोरे जावू शकले नाहीत. यावरूनच त्यांची स्वताबद्दलची आणि पक्षाबद्दलची उदासीनता किती होती हे स्पष्ट होते. आजच्या निकालामुळे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच ठरले आहेत. केवळ चुकीचे प्रवक्ते आणि सल्लागारांमुळे उद्धव ठाकरे यांना सर्व गमवावे लागले', असा टोला मंत्री विखे यांनी लगावला.

सत्ता होती तेव्हा देखील आणि गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचा फक्त थयथयाट सुरू होता. यामुळे त्यांचा चेहरा उघडा पडला आहे. जेष्ठ नेते शरद पवार आता त्यांनी सुप्रीम कोर्टातच नाही तर त्यापेक्षाही मोठ्या कोर्टात जायला सांगतील. कारण सत्तेचा डाव मांडायचा आणि नंतर पाठीत खंजीर खुपसायचे, असेच राजकारण त्यांचे आजपर्यंत आपण पाहिले आहे, असे मंत्री विखे यांनी म्हटले.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT