Shivsena Thackeray Group : उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का; 'मशाल' चिन्हही जाणार?

Mashal Symbol Claims on Samata Party : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता.
Shivsena Thackeray Group
Shivsena Thackeray GroupSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (दि. 10 जानेवारी) शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देत नार्वेकरांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला, तर यापूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला होता.

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरेंच्या हातातून आता 'मशाल' चिन्हदेखील जाण्याची शक्यता आहे. समता पक्ष मशाल या चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चिन्हासाठी लागणाऱ्या सर्व अटी समता पक्षाने पूर्ण केल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena Thackeray Group
MLA Disqualification Result : कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पहिला तिखट वार...

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. तसेच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा केल्यानंतर शिवसेना नेमकं ठाकरेंची की शिंदेंची ? असा प्रश्न निर्माण झाला.

यानंतर या सत्तासंघर्षाची लढाई थेट निवडणूक आयोगात पोहोचली. यानंतर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण काही काळासाठी गोठवण्यात आलं. त्यानंतर आयोगात काही काळ सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दोन्ही शिंदे गटाला मिळाले.

दरम्यान, त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरतं देण्यात आलं. पण या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार ?, तसेच समता पक्षाच्या दाव्यावर निवडणूक आयोग (Election Commission) काय निर्णय देणार ? हे येणाऱ्या काही दिवसांत समोर येईल.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Shivsena Thackeray Group
Rahul Narwekar Verdict : शिवसेनेचा 'निकाल' लागला, आता राष्ट्रवादीची पाळी; 31 जानेवारीला काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com