MLA Faruk Shah Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शहीदांच्या परिवारासोबत आमदार फारूक शाह यांची भाऊबीज!

धुळे शहरात भाऊबीजनिमित्त आनंदनगर येथे आमदार फारुक शाह यांनी भाऊबीज साजरी केली.

Sampat Devgire

धुळे : दिवाळीत (Diwali) भाऊबीजेला महत्त्व आहे. हा सण भाऊ- बहिणीच्या प्रेमाचे (Affection of Brother & Sisters) प्रतीक मानला जातो. त्यासाठी बहिणीकडून भावाला ओवाळले जाते. यात देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, अशा शहीद जवानांच्या परिवारासोबत आमदार फारुक शाह (MLA Faruk Shah) यांनी दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली. (AIMIM MLA Faruk shah celebrate festival in Dhule)

आमदार शाह हे स्वतः शहीदांच्या घरी गेले. ऑपरेशन पराक्रमअंतर्गत कारगिलमधील लोअरमुंडा हायवेवर वीरमरण आलेले जयवंत वसंतराव सूर्यवंशी यांच्या पत्नी भारती या इंदिरा गार्डन परिसरात आनंद नगरात राहतात. त्यांनी आमदार शाह यांना ओवाळले.

साक्री रोड परिसरातील कल्याणी नगरातील कोरोना महामारीत मृत्यूमुखी पडलेले हवालदार भूषण वाघ यांच्या पत्नी मनीषा, त्याचप्रमाणे कोरोना महामारीत मृत्यू आलेले हवालदार प्रकाश पुंडलिक मोरे यांच्या पत्नी शोभाबाई, ऑपरेशन रक्षकअंतर्गत दक्षिण काश्मीरच्या निरपुरा येथील दहशतवाद्यांच्या चकमकीत वीरमरण आलेले महार रेजिमेंटचे जवान मुंग्या नुरजी राऊत यांच्या पत्नी अरुणा (रा. श्रमसाफल्य कॉलनी), सियाचिन मध्ये वीरमरण आलेले मनोहर रामचंद्र पाटील यांच्या पत्नी माया (रा. न्याहळोद) यांच्या परिवारासोबत आमदार शाह यांनी भाऊबीज साजरी केली.

ओवाळणीनंतर आमदारांनी शहीद जवानांची आई, पत्नी यांना साडी, फराळ भेट म्हणून दिला. सलीम शाह, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण, शहराध्यक्ष नगरसेवक मुक्तार अन्सारी, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमीर पठाण, माजी नगरसेवक साजिद साई, निसार अन्सारी, आसिफ पोपट शाह, कैसर अहमद, रफिक पठाण, हालिम शमसुद्दिन, नजर खान, रियाज शाह, साकिब शाह, शोएब बागवान आदी उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT