Kishor Patil & Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mangesh Chavan: आमदार किशोर पाटलांसह राष्ट्रवादीनेही भाजप आमदार मंगेश चव्हाणांना घेरलं, काय आहे प्रकरण?

Jalgaon BJP MLA Mangesh Chavan: शिवसेना एकनाथ शिंदे आमदार किशोर पाटील आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात जिल्हा बँक निवडणुकीवरून जोरदार रंगला आहे. पाचोरा गटातील सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात साठी आमदार मंगेश चव्हाण यांनी राजकीय दबाव आणला होता. निवडणूक निर्णय अधिकारी त्याला बळी पडले.

Sampat Devgire

Jalgaon News: जळगाव जिल्हा बँकेतील सुमित पाटील अर्ज अवैध प्रकरण चांगलेच गाजते आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत राजकीय दबाव आणला होता. त्यामुळे महायुतीतच जोरदार आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे आमदार किशोर पाटील आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात जिल्हा बँक निवडणुकीवरून जोरदार रंगला आहे. पाचोरा गटातील सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात साठी आमदार मंगेश चव्हाण यांनी राजकीय दबाव आणला होता. निवडणूक निर्णय अधिकारी त्याला बळी पडले.

महायुतीचे घटक पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यातील या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही उडी घेतली आहे. सत्तेचा गैरवापर करून उमेदवारांना बाद करण्याचे अनैतिक राजकारण आमदार चव्हाण करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे आणि किशोर पाटील यांचं विविध नेत्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिसांना आमदार चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. याबाबत पोलिसांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

कोल्हापुरातील गोकुळ प्रकरण ताजे असतानाच जळगावतही सत्तेचा दुरुपयोग झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपण सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यासाठी दबाव आणल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे. त्यांचे हे विधान गांभीर्याने घेऊन प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही दिलीप खोडपे यांनी दिला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे आमदार किशोर पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात जोरदार राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे प्रकरण अगदी एकेरीवर गेले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यात उडी घेतली आहे. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी जाहीरपणे दिलेली राजकीय दबावाची कबूल त्यांना अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT