Supriya Sule: कोर्टाबाहेरच भरदिवसा तरुणावर गोळीबार अन् कोयत्यानं सपासप वार; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, 'पुण्याचं पालकत्व घ्या...'

Pune Firing Case: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर बुधवारी(ता.25) धक्कादायक घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी हत्या प्रकरणातील आरोपीवर दोन दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी सुरुवातीला गोळीबार केला. पण निशाणा चुकताच हल्लेखोरांनी थेट या व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार केले.
CM Devendra Fadnavis, Supriya Sule
CM Devendra Fadnavis, Supriya SuleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर बुधवारी(ता.25) धक्कादायक घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी हत्या प्रकरणातील आरोपीवर दोन दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी सुरुवातीला गोळीबार केला. पण निशाणा चुकताच हल्लेखोरांनी थेट या व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुण्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनीही या घटनेनंतर मुख्यमंत्री यांना मोठं आवाहन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद आणि सोशल मीडियावर पोस्ट करत पुणे शहरातील दिवसागणिक वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, पुण्यात गेल्या काही काळापासून कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न प्रत्येक पुणेकर विचारत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मी मुख्यमंत्र्यांना नेहमी सांगत आले आहे की, पुणे शहर हे गुन्हेगारीच्या बाबतीत देशात पाच नंबर आणि महाराष्ट्रात एक नंबरला आहे. मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत, मला त्यांच्यावर टीका करायची नाही, राजकारण करायचे नाही. मात्र, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चूक असेल दोषींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

हिंजवडीमध्ये राजीव गांधी हे मोठं इन्फोटेक पार्क पार्क आहे, त्याठिकाणी सहा लाख लोकं काम करतात. त्या पुण्यात आज जी घटना घडली, ती अतिशय चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याची आणि महाराष्ट्राची नागरीक म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, आपण पुण्याची जबाबदारी स्वत: घ्यावी. आपण त्याचं पालकत्व घ्यावं. कारण हे पुण्याला न शोभणारं आणि न झेपणारं आहे.

CM Devendra Fadnavis, Supriya Sule
Buldhana Mahabeej News: कामगार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात कामगारांवर मोठा अन्याय..! 'महाबीज'च्या 35 वर्षांपासूनच्या कामगारांना अचानक काढलं...

मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. पण तेच पोलिस पुण्यात आल्यानंतर काय होतं? पुणे पोलिसांना याचं उत्तर द्यावं लागेल. त्याचा जाब मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना विचारावा, अशी मागणी मी करते. एकीकडे पुण्यात सगळ्या मोठ्या शिक्षण संस्था असून खूप मोठी उलाढाल, व्यवसाय पुण्यातून होत असताना त्याचठिकाणी एवढा क्राईम वाढणं हे शहर आणि देशाच्या हिताचं नसल्याचंही सुळे यांनी म्हटलं.

सोशल मीडियावरही पोस्ट

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरही पोस्ट करत पुणे कोर्टाबाहेर घडलेल्या हल्ल्यावरुन संताप व्यक्त केला आहे. त्या पोस्टमध्ये म्हणतात, न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

CM Devendra Fadnavis, Supriya Sule
Uddhav Thackeray News: सोशल मीडियावरचा वाद विकोपाला, 20 नोव्हेंबरला रस्त्यावरच राडा; अखेर ठाकरेंचा पुण्यातील महिला नेत्याला दणका

भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी? गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. गेल्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे, असं सुळेंनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.