MLA Kishor Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अशा विरोधकांची कीव करावीशी वाटते!

आमदार किशोर पाटील यांचा पाटबंधारे प्रकल्पांसाठी आंदोलनाचा इशारा

Sampat Devgire

पाचोरा : पाचोरा - भडगाव (Jalgaon) विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठ्या विश्वासाने केवळ विकासकामे व न्यायासाठीच लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली असून, सत्तेत (Mahavikas Aghadi) जरी असलो तरी सरकारविरोधात आंदोलन करण्यामागे केवळ लोकहित हाच उद्देश आहे. त्यासाठी सत्तेची पर्वा कधीही केली नाही, असा इशारा आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी दिला आहे. (MLA Kishor Patil warns Id department for pending devolopment works)

आमदार पाटील यांनी मतदारसंघातील पाटबंधारे विभागाच्या कामांसाठी उपोषण, आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन कामे सुरू करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात रविवारी आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मतदारसंघातील पाचोरा व भडगाव तालुक्यातील कालव्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करणे अत्यावश्यक आणि गरजेचे असल्याने पाटबंधारे विभागाला लेखी व तोंडी सूचना देऊनही या कामांकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. पावसाळ्यापूर्वी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सत्ताधारी, आमदार असलो तरी दिला व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

पावसाळा आठवड्याभरावर आला असताना देखील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मतदारसंघातील लघु पाटबंधारेचा घोडसगाव बंधारा तसेच भडगाव तालुक्यातील कजगाव, पथराड कालवा दुरुस्तीचे कामे प्रलंबित आहे. आगामी पावसाळ्यात पिंपळगाव हरेश्वर, सावखेडा व वरखेडी गावाला धोका निर्माण होऊन ही गावे पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव यांना बैठकीतून अवगत केले होते. तरीही या कामांची सुरवात होत नसल्याने आमदार किशोर पाटील यांनी जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी थेट उपोषणाचा इशारा दिला.

या भूमिकेविरोधात काही विरोधकांनी राजकीय उद्देश समोर ठेवून सत्ताधारी आमदारांनाही सरकारविरोधात आंदोलन करावे लागते, असा सूर व्यक्त केला. अशा विरोधकांची कीव करावीशी वाटते. जिल्हाधिकारी यांनी विषयांचे गांभीर्य पाहून तत्काळ दखल घेत पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना पाचोरा-भडगाव तालुक्यातील प्रलंबित धरणांच्या दुरुस्ती कामांचे आदेश दिले. गेल्या दोन दिवसांत दोन्ही तालुक्यातील धरण दुरूस्तीची कामे सुरू करण्यात आली असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले.

दोन्ही तालुक्यातील मागणी केलेल्या धरणांच्या दुरूस्तीची कामे सुरू झाल्याने सोमवारचे उपोषण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले व विरोधकांनी केलेल्या टीकेला आमदार पाटील यांनी धोबीपछाड मारली. पत्रकार परिषद तासभर चालली. यावेळी नंदू पाटील, राजेश पाटील, प्रवीण ब्राम्हणे उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT