Eknath Shinde, Kishore Patil News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon politics : एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला तर 'कमळ' चिन्हावरही लढू : आमदार पाटलांनी केले स्पष्ट

CM Eknath Shinde News : शिवसेना शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबीत आहे.

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News : आमचा पक्ष अधिकृत शिवसेना आहे, निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्हही दिले आहे. त्यामुळे आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. मात्र, काही तांत्रिक अडचण आली आणि आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला तर आम्ही 'कमळ' चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार आहोत, असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले.

शिवसेना शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबीत आहे. त्याची सुनावणी सुरू असून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लवकरच त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला निवडणूक चिन्ह दिले, असून अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच सूनावणी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षाकडे सुरू असलेल्या सुनावणीत शिवसेना शिंदे गट अपात्र ठरू शकतो. मात्र, त्यांनी आताही भाजपत (BJP) सामील होण्याचा निर्णय घेतल्यास त्यांची आमदारकी आणि पुढील अपात्रताही वाचू शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना शिंदे गटाचे आमदार 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढण्याबाबतची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेना (Shivsena) शिंदे गट भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत बोलतांना पाटील म्हणाले, आमच्या शिंदे गटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, आमचा पक्ष अधिकृत आहे. आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अडचण आमच्या आमदारांना येणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे.

मात्र, तरीही काही तांत्रिक अडचण आलीच आणि आमचे नेते राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला मान्य असेल. पक्षात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमचे नेते एकनाथ शिंदे यांनाच आहे. आम्ही त्यांचा हा निर्णय आनंदाने स्विकारून निडणुकीत यश मिळवून दाखवू. आज राज्यात भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना शिंदे गट, अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० पेक्षा अधिक जागा मिळविणारच आहोत. हेच खरे वास्तव आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT