Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न राबवण्यासाठी काँग्रेसने तयारी केल्याचे दिसत आहे. यासाठी काँग्रेसच्या टीमही कामाला लागल्या आहेत. राज्यभरात चोवीस टीम कामाला लागल्या असून काँग्रेसची ताकद तपासण्याचे काम या टीमकडून सुरू असल्याचं स्वत: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच सांगितलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज इचलकरंजीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या 24 टीम राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत नेमकं काय करावं लागेल, याचा अभ्यास सुरू आहे.आमची ताकद किती आहे याचाही अंदाज घेत आहोत. महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न राबवला जात आहे. हातकणंगले, कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे.
आम्ही तीनही पक्ष भाजपाच्या विरोधात लढणार आहोत, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. तसेच, पक्ष फुटले तरीही जनमत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाजूने आहे.त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण महाराष्ट्रात सातत्याने सभा घेणारे भारत राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपाची बी टीम आहे. भारत राष्ट्र समितीला भाजपाच रसद पुरवत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. तरीही त्याचा काही परिणाम होणार नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जातीयवादी पक्षांचा नेहमीच विरोध केला आहे. त्यामुळे ते भाजपासोबत कधीच जाणार नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. शेट्टी यांच्याशी महाविकास आघाडीच बोलणं सुरू आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.