Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार कुणाल पाटील यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी मिळवले ३६ कोटी

राज्याच्या अर्थसंकल्पात मतदारसंघासाठी तरतूद झाल्याने रस्ते होणार चकाचक

Sampat Devgire

धुळे : तालुक्यातील (Dhule) रस्त्यांच्या कामांसाठी ३५.७५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शुक्रवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात (Budget) रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूद झाली आहे, अशी माहिती आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी दिली. या निधीतून तालुक्यातील रस्ते चकाचक होतील, असे ते म्हणाले.

धुळे तालुक्यात रस्त्यांची कामे व्हावीत, तसेच नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची सुधारणा व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या. रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव तयार करून घेतले. ते शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव सादर झाल्यावर त्याचा पाठपुरावा केला. या प्रस्तावातील कामांना मंजुरी मिळावी, राज्याच्या अर्थसंकल्पात त्यांचा समावेश व्हावा, यासाठी मंत्रालयीन स्तरावर आपण वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार धुळे तालुक्यातील रस्त्यांसाठी ३५.७५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामांसाठी तशी तरतूदही अर्थसंकल्पात झाली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT