महाविकास आघाडी नाशिकवर उदार...हायस्पीड रेल्वेला १६ हजार कोटी

नाशिक पुणे रेल्वेच्या भुसंपादनाचा मार्ग झाला मोकळा.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्याच्या (Maharashtra) अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी १०० कोटीची तरतूद झाली आहे. नाशिक (Nashik) पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी राज्याच्या निधीसाठी आर्थीक तरतूद धरली गेली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठात मेडीकल महाविद्यालय सुरु करण्याच्या विषयाला आर्थीक तरतूदीमुळे चालना मिळाली. सात आदिवासी तालुके असलेल्या नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात आदिवासी (Trible) औद्योगिक क्लस्टर उभारण्यासारख्या महत्वाच्या निर्णयांचा नाशिकला दिलासा मिळाला आहे.

Ajit Pawar
भाजपची पश्चातबुद्धी; म्हणतात तुकाराम मुंडेनी लादलेली करवाढ मागे घेणार!

राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला गेला. त्यात, नाशिककर नागरिकांच्या दृष्ट्रीने जिव्हाळ्याच्या असलेल्या महत्वाच्या प्रकल्पांना निधीची तरतूद झाली हे नाशिककरांसाठी वैशिष्ट्य म्हणता येईल. महत्वाच्या पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी १६ हजार कोटीचा प्रस्ताव आहे. त्यासाठी भूसंपादन मूल्यांकनाची प्रक्रिया सुरु आहे. पुढील आर्थीक वर्षात एप्रिल पासून भूसंपादन सुरु होणार आहे. त्यासाठी निधी मिळाल्याने पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

Ajit Pawar
बागलाणच्या आमदार कोण? भाजपचे बोरसे की राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण!

दिंडोरीत आदिवासी क्लस्टर भवन

नवउद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक मधील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारणार आहे.

नाशिक जिल्ह्यात सात आदिवासी तालुके असून राज्याचे आदिवासी आयुक्तालय नाशिकला आहे. अशात आता दिंडोरीत आदिवासी औद्योगिक क्लस्टरच्या घोषणेमुळे आदिवासी उपयोजनांच्या अंमलबजावणी सोबतच आदिवासीच्या औद्योगिक विकासला गती देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापिठात नाशिकसाठी वैद्यकिय महाविद्यालयाचा प्रस्ताव असून त्यात फ़िजिओथेरिपी केंद्र उभारण्यात येणार असून नाशिक मधील आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.हा निर्णय नाशिककरांना समाधान देणारा आहे. तसेच

भाषा भवन नेमके कुठे ?

नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नाशिकला निर्णय जाहीर झाला असून त्यासाठी अर्थसंकल्पनात १०० कोटीची तरतूद झाली आहे. मात्र या भवनाबाबत मुंबईत जागा निश्चितीची घोषणा झाल्याने मराठी भाषा भवन नाशिकला कि मुंबईला हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

अर्थसंकल्पात नाशिक...

- दिंडोरीत आदिवासी औद्योगिक क्लस्टर

- आरोग्य विद्यापिठात मेडीकल कॉलेज

- नाशिकला फिजिओथेरेपी केंद्र होणार

- सेमी हायस्पीड रेल्वेसाठी तरतूद

- मराठी भाषा भवनासाठी १०० कोटी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com