MLA Prajakt Tanpure sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pune Porsche Accident : आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, "स्वप्न चिरडणारा श्रीमंत बापाचा लेक दोषीच..."

Pradeep Pendhare

Pune Accident News : पुणे हिट अँड रन प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुपंली आहे. एकमेकांना दोष देत आहे. न्यायालयाने प्रकरणातील आरोपीला २४ मे रोजीपर्यंत पोलिस कोठडी देखील सुनावली. यावर नगर जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यावर भाष्य करत सिस्टीमला ढील देणारे गृह खाते आणि प्रशासन व्यवस्था जेवढी जबाबदार आहे, तेवढेच पालक देखील दोषी आहे, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांनी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी समाज माध्यमांचे आभार मानत नेक्सस मोडून काढायला योगदान देणाऱ्यांचे आभार मानले. छोट्या शहरातून मोठी स्वप्न घेऊन आलेल्या सर्वसामान्य युवक-युवतींचे स्वप्न चिरडणारा श्रीमंत बापाचा लेक दोषीच आहे, असेही प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेत श्रीमंत बापाचा लेक जेवढा दोषी आहेच, त्याचसोबत या सिस्टीमला ढील देणारे गृह खाते, प्रशासन व्यवस्था, त्या मुलाचे पालक देखील तितकेच दोषी आहेत. सर्वसामान्यांच्या जीवाचा खेळ मांडला आहे. बड्या लोकांना पाठिशी घालत सामाजिक व्यवस्था अस्थिर करण्याचे पाप हे राज्य सरकार करत आहे, असा आरोप प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला. Pune Hit And Run Case

या अपघातावेळी घटनास्थळी असलेल्या पुण्यातील (Pune) नागरिकांची जागरूकतेचे कौतुक करत समाज माध्यमांतून निर्माण झालेला दबाव, यामुळे परिणामकारक कारवाई होत असल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले. नाहीतर अन्यथा चालक आरोपी करून मुलाची, बापाची तसेच अन्य यंत्रणांची सहज सुटका झाली असती. तसेच नेक्सस मोडून काढायला योगदान देणाऱ्यांचे देखील प्राजक्त तनपुरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT