Pune Hit And Run Case News: पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अँण्ड रन' प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागं झालं आहे. संपूर्ण राज्यभर रात्री उशीरापर्यंत चालणारे पब, बार, मद्यपेय देणारी हॉटेल्स तपासणीची धडक मोहीम राज्य उत्पादन शुल्क हाती घेतली असून याबाबतची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे.
साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुण्यातील 'हिट अँण्ड रन' प्रकणावर भाष्य केलं. देसाई म्हणाले, पुण्यातील कल्याणीनगर (Pune Kalyani Nagar) येथे झालेला अपघात दुर्दैवी असून तो अल्पवयीन मुलाच्या हातून घडला आहे. तो ज्या पबमध्ये बसून मद्य प्राशन करत होता, त्या दोन्ही पबचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) आता तपासणी आणि कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. रात्री उशीरापर्यंत चालणारे पब, बार, मद्यपेय देणारी हॉटेल्सची तपासणीची धडक मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाती घेतली आहे. ही मोहिम राज्यभर चालणार आहे. तसेच यामध्ये काही चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचंही मंत्री देसाई म्हणाले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी कोझी हॉटेलचे (Cozy Hotel) मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी याबाबतचे आदेश दिले. 'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे, असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.