Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Prajakt Tanpure : 'योजनांवरील कोट्यवधींचा खर्च म्हणजे ठेकेदारांवर..' ; तनपुरेंचा मोदी सरकारवर निशाणा!

Prajakt Tanpure Vs Modi Goverment : ‘मोदींची गॅरंटी’ म्हणून केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसारावर आमदार तनपुरे यांचा आक्षेप

Pradeep Pendhare

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ‘मोदींची गॅरंटी’ म्हणून केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. यापूर्वी ही सर्वांना घरांची गॅरंटी दिली होती. प्रत्यक्षात घरे मिळाली नाहीत. ‘हर घर जल’ या योजनाही फसली आहे. प्रत्येक घराला नळ जोडणी नसून 20 घरे असल्यास नळ जोडणी प्रस्तावित आहे. या योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणीनंतरच शाश्‍वती येणार आहे. या योजनेवर हजारो कोटींचा खर्च केला जात आहे. हा खर्च फक्त ठेकेदारांवर होत आहे", असा आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीसाठी आमदार तनपुरे हे आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणावर टीका केली.

आमदार तनपुरे(Prajakt Tanpure) म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये मोठी तफावत आहे. यापूर्वीच्या अनेक योजनांमधून हे सिद्ध झाले आहे. आता हर घर जल म्हणून जलजीवन योजना राबविली जात आहे. प्रत्येक घराला पाणी दिले जाईल, असे भासविले जात आहे. प्रत्यक्षात योजनेचा अभ्यास केला असता 20 घरांची वस्ती असेल तरच पाणी योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक घराला पाणी मिळणार नाही. या योजनेवर हजारो कोटींचा खर्च केला जात आहे. हा खर्च फक्त ठेकेदारांवर होत आहे. योजनेच्या दर्जा योग्य नाही, त्यामुळे ही योजना किती काळ चालेल, याची खात्री नाही".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच विविध प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलामध्ये पूर्वी राज्य शासन 50 टक्के सवलत देत होते. आता ही सवलत बंद केली आहे. या योजना सुरू ठेवण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारून या योजनांना वीज उपलब्ध करून देणे गरजेचे होते, असेही आमदार तनपुरे यांनी म्हटले.

दररोज कुठंतरी गोळीबार सुरू...

'राज्यातील सत्ताधाऱ्यांना खुर्ची सांभाळणे एवढेच काम आहे. आमदारच गोळीबार करत आहेत. दररोज कुठंतरी गोळीबाराची घटना घडत आहे. गुन्हेगारांना सरकारची भीती वाटत नाही. सर्व सामान्य जनता भयभीत झाली आहे.', असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

लोकशाहीचा खून

'लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष ही सत्ताधाऱ्यांएवढाच महत्वाचा असतो. तपास यंत्रणांचा धाक दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडले जाते. विरोधी पक्ष नष्ट करणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे. आम्ही थोडे असलो तरी गेंड्याच्या कातडीच्या सरकारपर्यंत जनेतच्या भावना प्रभावीपणे मांडणार आहोत.', असे देखील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT