Chavan Resign Impact : हिरामण खोसकर केनिया दौऱ्यावर; राजीनाम्याचा निर्णय नाशिकमध्ये परतल्यावर घेणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोतकर नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
Hiraman Khoskar-Ashok Chavan
Hiraman Khoskar-Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आमदार आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासमवेत 11 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातील इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी अद्याप राजीनामा दिला नाही. ते सध्या केनियाच्या दौऱ्यावर आहेत. (Hiraman Khoskar's resignation decision is not yet)

या अकरा आमदारांमध्ये नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे हिरामण खोसकर यांचेदेखील नाव घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हिरामण खोसकर हे जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यास जिल्हा पूर्णतः भाजपमय होऊन जाईल. (Ashok Chavan Resign Impact)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hiraman Khoskar-Ashok Chavan
Praniti Shinde on Chavan Resign : ‘अशोक चव्हाणांसोबत भाजपने मोठा माइंड गेम खेळलाय; हताश होऊन त्यांनी राजीनामा दिलाय’

या पार्श्वभूमीवर हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्यातील 22 आदिवासी आमदार सध्या केनियाच्या दौऱ्यावर आहेत. ता. 5 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा दौरा 14 फेब्रुवारीला संपणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला आमदार खोसकर भारतात परततील. त्यावेळी ते याबाबत स्पष्टीकरण देतील, असे वामन खोसकर म्हणाले.

खोसकर यांच्या कार्यालयातर्फे या संदर्भात एक पत्रकदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये खोसकर यांचा भाजप प्रवेश आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा या दोन्ही गोष्टी सत्य नाहीत. येणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नाहीत. खोसकर सध्या केनियाला असल्यामुळे त्यात काहीही तथ्य नाही, असा दावा करण्यात आला आहे.

Hiraman Khoskar-Ashok Chavan
Ashok Chavan Resign Congress : विश्वासदर्शक ठरावाला उशीर ते भाजप पदाधिकाऱ्याच्या घरची चव्हाणांची ‘ती’ भेट ठरली महत्त्वपूर्ण...

हिरामण खोसकर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात ते पक्षाचे आमदार झाले. मात्र, खोसकर हे जिल्हा परिषद आणि मजूर सहकारी संस्थांशी संबंधित असल्याने ते सर्वपक्षीयांमध्ये वावर असलेले आमदार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील खोसकर यांच्या संदर्भात ते आमचेच आमदार आहेत, असा दावा यापूर्वी केला होता. अशा स्थितीत आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोतकर नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Edited By : Vijay dudhale

R

Hiraman Khoskar-Ashok Chavan
Kolhapur Loksabha : कोल्हापुरात महायुती मास्टरस्ट्रोकच्या तयारीत; महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com