Nashik farmers protest  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Dikhale News : सत्ताधारी आमदारही शेतकऱ्यांच्या बाजूने; सिंहस्थ रिंग रोड भूसंपादनावरून भडका; आमदार ढिकलेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

Nashik farmers protest against land acquisition : नाशिकमधील सिंहस्थ रिंग रोड भूसंपादन प्रकरण तापले असून आमदार ढिकले यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Sampat Devgire

Kumbh Mela News : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असताना रिंग रोडचे भूसंपादन रखडले आहे. संदर्भात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढणे कठीण बनले आहे. मातोरी आणि दरी येथील कुंभमेळ्याच्या भूसंपादनात महिलांवर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा प्रश्न तीव्र आहे. हा सबंध भूसंपादनाचा वाद तीव्र बनला आहे. गेले दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघातील भूसंपादनाबाबत शेतकरी आक्रमक आहेत. त्यामुळे आमदार ढिकले यांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी मग मला बाद येथील शेतकरीही उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळा रिंग रोडच्या भूसंपादनातील त्रुटी आणि गोंधळावर यावेळी चर्चा झाली.

शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. काही शेतकऱ्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा खोडसाळपणा जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिला. प्रशासनातील काही अधिकारी व्यक्तिगत हिताला प्राधान्य देत आहेत. ठराविक अधिकाऱ्यांचे हित पाहिले जाते. त्यांना नियोजित रिंग रोडच्या आराखड्यात बदल करण्यात आल्याचा गंभीर आरो यावेळी झाला.

त्यामुळे सत्ताधारी आमदार ढिकले यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावले. शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या. शेतकऱ्यांना मोबदला देताना आणि संपादन करताना कोणताही अन्याय झाल्यास सहन केले जाणार नाही, या शब्दात आमदार ढिकले यांनी यावेळी प्रशासनाला सुनावले.

गेले काही दिवस या प्रश्नावर शेतकरी आणि लोकप्रतिनिधी आंदोलन करीत आहेत. आता त्यात सत्ताधारी आमदार ढिकले यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे रिंग रोडच्या भूसंपादनातील त्रुटी दूर करण्याचे गंभीर आव्हान प्रशासना पुढे उभे राहिले आहे. त्यातून कसा मार्ग काढला जातो याची उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT