Cabinet decisions : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठे पाऊल; मंत्रिमंडळ बैठकीतील 4 महत्त्वपूर्ण निर्णय!

Cabinet meeting important decisions Maharashtra : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नवीन बदली नियम आणि महत्त्वाच्या घोषणांची संपूर्ण माहिती वाचा.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रशासन, परिवहन, उद्योग आणि महसूल विभागाशी संबंधित विविध प्रस्तावांना यावेळी मंजुरी देण्यात आली.

विशेष म्हणजे, 2026 मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कामकाजातील विलंब टाळण्यासाठी असलेल्या 2005 च्या कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis
पाकिस्तानने धुडकावलेला ट्रम्प यांचा 'अब्राहम करार' नेमका काय? जो मान्य केल्यास इस्रायलला अधिकृत मान्यता मिळणार...

या निर्णयामुळे राज्यातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून बदली प्रक्रियेसाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. प्रशासनातील कामकाज सुरळीत राहावे आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

तसेच या बैठकीत कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या स्मृतींना अभिवादन करत सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यासही मंजुरी देण्यात आली. आता या स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. कोकणातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आली आहे.

Devendra Fadnavis
Crime News : गोव्यात महाराष्ट्राच्या नागरिकांना मारहाण, माजी मंत्र्याच्या PA लाही झोडपलं; बांद्यात तणावपूर्ण परिस्थिती

याशिवाय, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील सागाव सोनारपाडा येथे असलेल्या पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. या जागेचा वापर नियमित करण्यास आणि नाममात्र दरात जमीन ट्रस्टच्या नावे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, नागपूरमधील नवीन बाह्य वळण रस्ता आणि नवीन नागपूर प्रकल्पासाठी आवश्यक खासगी जमिनींच्या खरेदी प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. हिंगणा तालुक्यातील गोदणी आणि लाडगाव (रीठी) परिसरातील जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यात येणार असून या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्याच्या पायाभूत सुविधा, प्रशासन आणि विकास प्रकल्पांना चालना देणारे हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com