Rahul Dhikle- Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Rahul Dhikale : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी राहुल ढिकलेंचे आता मुख्यमंत्र्यांना साकडे !

Nashik Metro Project : हा प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचा असला तरी त्याला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तयारी दर्शवली आहे. आमदार ढिकले यांना त्याबाबतचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Sampat Devgire

Nashik News : नाशिकला मेट्रो प्रकल्प देणार अशी घोषणा भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र हा प्रकल्प सरकारी फायलींच्या ढिगात हरवला.आता आमदार राहुल ढिकले यांनी या प्रकल्पासाठी मनावर घेतले आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला मेट्रो सुरू करणार अशी घोषणा केली होती. त्यावर महापालिकेसह राज्य शासनाने काही प्रमाणात कामही सुरू केले होते. मात्र अद्याप ही मेट्रो कागदावरच राहिली आहे.

शहराचा हा प्रमुख प्रश्न आहे. राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्षाला त्याचा लाभ व्हावा,असे प्रयत्न आहेत. त्यासाठी आता आमदार ढिकले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच साकडे घातले आहे.त्यामुळे हा प्रकल्प कधी कार्यान्वित होतो, त्याला केव्हा मंजुरी मिळते याबाबत पुन्हा एकदा नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा प्रकल्प शासनाच्या मान्यतेनंतर 9 सप्टेंबर 2019 ला केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला होता. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाकडून या प्रस्तावाचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर पुढील मंजुरीसाठी तो संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात आला.

या संदर्भात वारंवार भाजपच्या नेत्यांनी घोषणा केल्या होत्या.मात्र प्रत्यक्षात ही मेट्रो गेल्या सात वर्षात कागदावरच राहिली आहे. आता आमदार ढिकले यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत.हा प्रकल्प देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा असला तरी त्याला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तयारी दर्शवली आहे.आमदार ढिकले यांना त्याबाबतचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.त्यामुळे नाशिकला न्यू मेट्रो सुरू होण्याच्या शक्यतेला पुन्हा एकदा नव्याने चालना मिळाली आहे. लवकरच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कार्यवाहीच्या आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

नाशिक महापालिकेची मुदत संपून दीड वर्ष झाले आहे.मात्र अद्याप महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासकीय राजवट असल्याने राज्य शासनाचे महापालिकेवर थेट नियंत्रण आहे.त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करावे लागणार आहे. त्याची सुरुवात या निमित्ताने झाल्याचे दिसत आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT