Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar : रोहित पवारांना आठवले 'माफीवीरांचे' कारनामे; मग काय संस्कारसह सर्वच काढलं...

Pradeep Pendhare

Mumbai News : सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नतमस्तक होऊन माफी मागितली खरी, पण ती विरोधकांना रुचली नाही. या माफीनाम्यात सावरकरांचा मुद्दा पुढे करून राजकारण केल्याची टीका होऊ लागली आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपने महापुरूषांच्या अवमानाचा घटनाक्रम मांडत, माफीवीरांच्या संस्कारावर घाणाघात केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर होते. तत्पूर्वी सिंधुदुर्ग इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजा यांचा पुतळा कोसळला होता. यावरून सत्ताधारी महायुती भाजपवर शिवप्रेमींची संतापाची लाट उसळली होती. महायुती भाजप सरकारवर महाविकास आघाडीकडून सडकून टीका झाली. महायुतीमधील प्रमुख तीन नेते या घटनेवर महाराष्ट्रांची वारंवार माफी मागत होते. तरी देखील शिवप्रेमी आणि मविआचे समाधान होत नव्हते. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यावर येत पुतळा कोसळण्यावर माफी मागताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा पुढे केला. या माफीनाम्यावर मविआ आक्रमक झाली असून, इथं देखील भाजपकडून राजकारण सुरू असल्याची टीकेची झोड उठवली आहे.

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत महायुती भाजप (BJP) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तशी ही पोस्ट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली आहे. पोस्टच्या सुरवातीलाच महायुती भाजप सरकारचा 'टेंडरबाज' राज्य सरकार, असा उल्लेख करत रोहित पवारांनी निशाणा साधला. दलाली खाल्ल्याने महाराष्ट्राला अभिमान ढासळला, याबद्दल आपण माफी मागितली. माफी मागणं आपल्या संस्कारात असल्याचं आपण केलेले वक्तव्य 100 टक्के खरं असून यात कुणाचंही दुमत नाही. परंतु माफी मागतानाही आपण राजकारण केलं, हे शोभणारं नाही, असा टोला रोहित पवारांनी पंतप्रधानांना लगावला.सावरकरांशी तुलना

छत्रपतींशी तुलना

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेप नाही, पण माफीच्या आडून छत्रपतींची आणि सावरकरांची तुलना केली, हे अधिक दुःखद आहे, असेही रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भाजपकडून महापुरूषांच्या झालेल्या अवमानांची प्रकरणं काढली.

महापुरूषांचा अवमान

यापूर्वी महाराष्ट्रात आपल्या लोकांनी शिवछत्रपतींची, क्रांतीसूर्य महात्म फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अवमान केला, तेंव्हा मात्र आपल्यातले माफीवीरांचे संस्कार का जागृत झाले नाहीत? छत्रपतींची तुलना करून राजकारण करणं हेच का भाजपचे संस्कार? असे प्रश्न रोहित पवार यांनी पोस्टमध्ये ती 'PMOIndia' टॅग केली आहे.

झोंबणारी पोस्ट

रोहित पवार यांची पोस्ट झोंबणारी आहे. त्याचे काय पडसाद उमटतात, हे देखील पाहावे लागणार आहे. भाजप यावर काय प्रतिक्रिया देतो, हे देखील पाहावे लागणार आहे. अलीकडच्या काळात रोहित पवार भाजपला घेरण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT