Saroj Ahire News: भगूर नगरपालिकेवर माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विजय करंजकर यांची वीस वर्ष सत्ता आहे. या सत्तेला आजवर विरोधक मोठे आव्हान देऊ शकले नव्हते. मात्र, ही स्थिती आता राहिली नाही अशी स्थिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी ही किमया करून दाखवली आहे. त्यांनी थेट भगूर शहरातच विजय करंजकर यांना मोठे आव्हान दिले आहे. या आव्हानामुळे विजय करंजकर यांचे राजकीय वर्चस्वच अडचणीत येते की काय अशी स्थिती आहे.
त्याला निमित्त घडले आहे ते भगूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन. नुकतेच हे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. भगूर नगरपालिकेसाठी 23 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे श्रेय घेण्यावरून करंजकर आणि आमदार अहिरे यांच्यात शाब्दिक बाण सुटले.
आमदार अहिरे यांनी थेट उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून करंजकर यांच्यावर मात केली. ही योजना मंजूर करण्यासाठी आमदार अहिरे यांनी नियमितपणे राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला. नगर विकास विभागाकडे पाठपुरावा देखील केला. विधानसभेत अवचित त्याचा मुद्दा उपस्थित केला.
हा सर्व पत्र व्यवहार आमदार अहिरे यांच्याकडे आहे. मात्र नगर विकास खाते सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने विजय करंजकर यांना हे श्रेय हवे होते. श्रेय घेण्यासाठी पुरेसा आधार त्यांच्याकडे नसल्याने आमदार अहिरे यांनी थेट भगूर शहरातच श्री करंजकर यांना आव्हान दिले.
त्यामुळे शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. हा सकारात्मक मुद्दा बाजूला पडला. चर्चा झाली ती करंजकर यांच्या आरोपांची. मात्र या प्रकरणात उपमुख्यमंत्री पवार यांनीही आमदार अहिरे यांना पाठबळ दिल्याने करंजकर यांची राजकीय कोंडी करण्यात आमदार अहिरे यशस्वी झाल्या, असे चित्र आहे.
श्री करंजकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षाने लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरे होत्या. मात्र त्यांच्या विरोधात शिंदे पक्षाच्या अहिरराव या बंडखोर उमेदवाराला ताकद दिली. मात्र खुद्द भगूर शहरातच लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये करंजकर यांनी पाठींबा दिलेल्यांना मतदारांनी नाकारले. लोकसभेला खासदार राजाभाऊ वाजे यांना तर विधानसभेला आमदार सरोज अहिरे यांना भगूर शहरात सर्वाधिक मतदान झाल्याने करंजकर यांना आमदार अहिरे यांनी धक्का दिला.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.