Ajit Pawar Politics : नाशिक जिल्हा बँकेला मदतीचा वादा करून अजितदादा आले अडचणीत?

Nashik district Bank funding News : नाशिक जिल्हा बँकेला 653 कोटींचे अर्थसहाय्य राज्य शासन देणार कसे? याचीच चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्हा बँकेला मदत व्हावी, यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत बीड आणि नाशिकच्या जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यावर चर्चा झाली. या चर्चेच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अडचणीची होऊन बसली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेली अनेक वर्ष आर्थिक अडचणीत सापडली आहे. या बँकेला मदत न केल्यास नाबार्ड कडून तिचा परवाना रद्द होण्याचा धोका आहे. त्यामुळे बँकेची स्थिती पूर्ववत करण्याचे आव्हान आहे. सध्या बँकेत दुसऱ्यांदा प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.

Ajit Pawar
Maharashtra Political News Live : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रोच्या दोन नवीन मार्गांना महापालिकेची मंजुरी

गेल्या दोन वर्षात या प्रशासकांकडून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत ठोस अशी कार्यवाही झाली नसल्याबाबत विविध घटकांचे नाराजी आहे. कर्ज वसुली आणि आर्थिक शिस्त याबाबत गोंधळाची स्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी मंत्रालयात याबाबत बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा बँकेला 653 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य भाग भांडवलाच्या स्वरूपात देण्यात यावे, असा प्रस्ताव देण्यात आला होता.

प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र अर्थ सचिवांनी त्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. जी संस्था गेल्या दहा वर्षात दोन वेळा कर्जमाफीचे पैसे मिळवून देखील सुस्थितीत येऊ शकली नाही. तिला अर्थसाहाय्य केल्यास ती संकटातून बाहेर पडेल, याची हमी काय? असा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच अजितदादा यांनी बँकेला निधी देण्याचा वादा केला. मात्र त्याची पूर्तता होण्यात अनेक अडचणी उद्भवल्या आहेत.

Ajit Pawar
Sharad Pawar NCP : सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; आमदाराच्या फ्लेक्सवरून तुतारी, पवारांचा फोटो गायब, ठाकरे-शिंदेंचे फोटो झळकले!

आता त्यात राज्य शासनाने हमी घ्यावी आणि राज्य सहकारी बँकेने जिल्हा बँकेला टप्प्याटप्प्याने अर्थसहाय्य करावे, असा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावाला बँकेच्या प्रशासकांनी विरोध दर्शवला आहे. असा निधी घेतल्यास त्यावर व्याज द्यावे लागणार आहे. तसेच चोख आणि उत्तम कारभार केला तरच बँक त्यातून बाहेर पडू शकते. तसा कार्यक्षम कारभार करण्याचा सध्याच्या प्रशासकांचा आत्मविश्वास आहे की नाही, याविषयी जिल्ह्यात चर्चा होत आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा वादा अनिश्चित होतो की काय, अशी स्थिती आहे. दरम्यान, दादांनी घेतलेल्या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांसह दिलीप बनकर, सरोज अहिरे, हिरामण खोसकर आणि नितीन पवार हे चार आमदार उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com