MLA Saroj Ahire
MLA Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

माझे विरोधक टक्केखोर, दलाल त्यांना लाजच नाही!

Sampat Devgire

नाशिक : गिरणारे (ZP) गटातील दलीत वस्त्यांतील मंजूर कामांना हरकत घेतल्याने आमदार सरोजताई अहिरेंवर (MLA Saroj Ahire) चांगलीच टिका होत आहे. यासंदर्भात आमदार अहिरें यांनी आरोप करणारांचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, `माझे विरोधक टक्केखोर (Commission Agents) आणि दलाल आहेत. त्यांना खोटे आरोप करताना लाज वाटत नाही`

आमदार सरोजताई अहिरे यांच्या विरोधात सुवर्णाताई दोंदे यांनी दलित वस्त्यांची कामे रद्द केल्याने टिका केली होती. याबाबत आमदार अहिरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, आमदार निधीचा पाच कोटींचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी मी उपलब्ध केला आहे. यामध्ये ७५ लाख रुपये गिरणारे गटाला आहेत. स्थानिक विकास निधी अर्थात आमदार निधीतील १३ टक्के निधी मागासवर्गीयांच्या विकासासाठी असतो. त्यातून देखील गतवर्षी ५२ लाखांची कामे मी केली आहेत. त्या आदी तीन कोटींचा निधी होता त्यातील तेरा टक्के निधी खर्च केला आहे. सध्या ती सर्व कामे प्रत्यक्षात सुरु आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, मागासवर्गीय वस्त्यांमध्ये शैचालयांची कामे केली जात नाहीत. तेथे शौचालये नसल्याने अस्वच्छता मोठ्या प्रामणात असते. त्याचा विचार करून मी या वस्त्यांमध्ये प्राधान्याने स्वच्छतागृहांची कामे हाती घेतली. त्यात महिलांच्या सुविधांचा विचार केला. त्याच बरोबर गटारी, रस्ते ही कामे देखील मोठ्या प्रमाणात सुरु केलेली आहेत.

आमदार अहिरे यांनी सांगितले की, देवळाली कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय वस्त्या आहेत. हाडोळा, स्टेशनवाडी, सोनेवाडी तीथे आज रस्त्यांची कामे सुरु आहेत. ते लोक तीथे अनेक वर्षांपासून रहात आहेत. ते जेव्हापासून राहतात तेव्हापासून तेथील वस्त्यांना रस्ते, शौचालये नव्हती. माझ्या माध्यमातून ही सर्व कामे केली आहे. एव्हढी कामे करून देखील जर माझ्यावर आरोप होतात. हे आरोप झाले त्या बैठकीत काही दलाल लोक होते.

आमदार हिरामण खोसकर यांनी याबाबत कुठेही व काहीही विधान केलेले नाही. मग दलालांनीच हा प्रश्न का उचलला. कोणाच्या परवानगीने उचलला? असा प्रश्न त्यांनी केला. त्या म्हणाल्या विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अपर्णाताई खोसकर यांचे नाव पुढे केले. त्या स्वतः येऊन माझ्या गटातील कामांबाबत अन्याय झाल्याचे बोलल्या का?. मग माझ्यावर आरोप करणाऱ्या दलालांना हा अधिकार दिला कोणी?. या टक्केखोर दलालांना अधिकार काय?. मागासवर्गीय वस्त्यांच्या बाबात माहिती न घेता जे लोक आज आरोप करून जातीय तेढ निर्माण करीत आहेत, त्यांना थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे. कोणतिही माहिती न घेता उचलली जीभ आणि लावली टाळूला असे करीत आहात. असे केल्याने त्यांची प्रसिद्धी होऊ शकत नाही.

कोणी तरी मोठ्या व्यक्तीवर आरोप करायचे व प्रसिद्धी मिळवायची हा फंडा आहे. मी मोठी नाही. लोक मला म्हणतात मी गर्विष्ठ आहे. कोणाचीही फसवणूक न करता प्रामाणिकपणे मी बोलते. मला फसवणूक व खोटे बोलणे जमत नाही. त्यामुळे काही लोकांना आवडत नाही. कारण आजवर लोकांनी फक्त गोड बोलणे ऐकले. गळ्यात हात घालून घेतले. पार्ट्या झोडल्या, मात्र मतदारसंघाचा विकास झाला नाही. गेली वीस, पंचवीस वर्षे ते नीळ गुलाल करून निवडून आले. त्यांनी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये किती कामे केली? असा प्रश्न त्यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली मतदारसंघ अध्यक्ष सोमनाथ बोराडे, व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, राजाराम धनवटे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT