Satyajeet Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा मोठा आरोप; ''NEET' परीक्षेत एक नव्हे तर, चार घोटाळे'

Pradeep Pendhare

Satyajeet Tambe News : 'नीट' परीक्षेतील गोंधळावरून नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाविषयी असलेल्या गांभीर्यावर संताप व्यक्त केला.

'नीट' परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळावर नाचक्की झाली असून, देशाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. केंद्र सरकार आणि त्यांच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सींना अजूनही जाग येत नाही हे दुर्दैव आहे, अशी गंभीर टिप्पणी करत चोऱ्यामाऱ्या करून होणारे डाॅक्टर काय सेवा देणार? नीट परीक्षेत एक नव्हे तर, चार घोटाळे झाल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.

आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी 'नीट' (NEET) परीक्षेतील गोंधळावर भाष्य करणारा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. केंद्र सरकार आणि त्यांच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला 'नीट'चे गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्वसामान्य पालक आणि त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाशी खेळ खेळला जात आहे.

मुलांना मनासारखे पेपर देता यावा म्हणून गुजरातमधील एका शाळेतील मुख्याध्यापकाला दहा लाख रुपये घेतल्याप्रकरणात अटक झाली आहे. तसेच नीट परीक्षेत एक नव्हे तर, चार घोटाळे झाल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. ग्रेस मार्क, पेपर लिक, परीक्षा केंद्र हायजॅक करणे, एकाच सिरीयलमधील मुलांना टाॅपर करणे, असे चार घोटाळे या नीट परीक्षेत झाल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, "आपल्या देशामध्ये 'नीट'च्या परीक्षेवर गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. पालकांनी पुरावे देखील दिलेत. केंद्र सरकार (Central Government), नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे यासंदर्भात पाठपुरावा करून निर्णय घेऊन, सामान्य परिवारातील मुलांना न्याय देण्याची मागणी होत आहे. मात्र दुर्दैवाने ठोस पाऊल उचलले गेली नाहीत. कुठेतरी कमिटी नेमायची, काहीतरी चौकशी करायची आणि थातुर-मातुर पद्धतीने या प्रश्नाकडे बघण्याची भूमिका केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेली दिसते".

दहा मिनिटीने पेपर उशिर झाला म्हणून संबंधितांना 40 मार्क ग्रेसमध्ये दिली गेली. काही केंद्रावर एक-एक तास पेपर उशिरा गेला. तेथील परीक्षार्थी मुलांना 240 मार्क ग्रेस पद्धतीने देण्यात आली. आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीने निर्णय घेऊन ग्रेस मार्क रद्द केली. यावरून एजन्सीने ही कार्यवाही करून कुठेतरी चुक मान्य केली आहे. घोटाळा मान्य केला. परंतु हा एकच घोटाळा झालेला नाही. 'नीट'च्या परीक्षेत तीन ते चार प्रकाराचे घोटाळे झाल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हणत केंद्राला धारेवर धरले.

'नीट'मध्ये चार घोटाळे

ग्रेस मार्क, सेंटर हायजॅक झाले, पेपर लिक करणे आणि एकाच सिरीअल नंबरच्या सात पेक्षा जास्त मुलांना टाॅपर करणे, असा चार घोटाळे झाल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले. या 'नीट' परीक्षेत 67 मुलांना 720 मार्क घेऊन टाॅपर झाले आहेत. आजपर्यंत नीटमध्ये तीन पेक्षा जास्त मुले टाॅपर झालेले नाहीत. हा फार मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 'नीट' परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

स्पर्धा परीक्षांच्याबाबत कायम चर्चा होती होती. आता 'नीट'बाबत देखील घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास सामान्य माणसांचा उडाला आहे. याबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतले पाहिजे. लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तरी सरकारला जाग येत नाही, हे दुर्दैव आहे. दोन हजार विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क रद्द करणार आहेत. पैसे देऊन, चोऱ्यामाऱ्या करून होणारे डाॅक्टर काय सेवा देणार आहे, असा गंभीर प्रश्न देखील सत्यजीत तांबे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT