Finance Ministry : अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय! राज्यांना पाठवले 1,39,750 कोटी

Modi 3.0 : जाणून घ्या, ही रक्कम नेमकी कशाची आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला किती रुपये आले आहेत?
Finance Minister
Finance Minister Sarkarnama
Published on
Updated on

Installment of Tax Devolution to States : केंद्रात पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या अर्थमंत्रालयाने, तिसऱ्या कार्यकाळातील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेतला. तत्पुर्वी पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाले, ज्यामध्ये मोदींनी अर्थ खात्याची जबाबादारी पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांनाच सोपवली आहे.

तर निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांच्या अर्थखात्याने जून 2024 महिन्यासाठी देणगी रक्कमेच्या व्यतिरिक्त राज्यांना कर हस्तातरणांचा एख अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू महिन्यात दोन्ही मिळून 1,39,750 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. यामुळे राज्य सरकरे विकास आणि निधी गुंतवणुकीत गती आणण्यात सक्षम होतील.

Finance Minister
Modi Cabinet Portfolio Announcement : 'मोदी 3.0' मंत्रिमंडळातील 'नारी'शक्ती सांभाळणार 'ही' महत्त्वाची खाती!

अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्यांना कर हस्तांतरणासाठी (Tax Devolution) 12,19,783 कोटी रुपयांची तरतूद होती. या रिलीजसह 10 जून, 2024 पर्यंत राज्यांना हस्तांतरित एकूण रक्कम आर्थिक वर्ष 2024-25 साठी 2,79,500 कोटी रुपये आहे.

वाटपाच्या समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक 25069.88 कोटी रुपये मिळाले आहेत. तर 14056.12 कोटी रुपयासंह दुसऱ्या स्थानावर बिहार आहे. तर तिसऱ्या स्थावर 10970.44 कोटी रुपयांसह मध्य प्रदेश आहे.

Finance Minister
Narendra Modi : मोदी 3.0 मंत्रिमंडळात 'दक्षिण'चाही मान; कोणत्या राज्याला किती मंत्रिपदं?

महाराष्ट्राचा क्रमांक या यादीत 8828.08 कोटी रुपयांसह 14 व्या स्थानावर असून , सर्वात शेवटचा म्हणजे 28 व्या क्रमांकांवर 10513.46 कोटींसह पश्चिम बंगालचा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com