Nashik News : नाशिकमधील नांदगावचे शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. एवढंच नाही तर त्यांनी शेतातूनच थेट मुख्यमंत्र्यांना फोनही लावला. याशिवाय मंगळवारी आमदार सुहास कांदे मुंबईत मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेत तालुक्याच्या नुकसानग्रस्त परिस्थितीबाबत त्यांना अवगतही करणार आहेत.
''अगोदरच दुष्काळाच्या घोषणेत निवडक मंडळाचा समावेश झाला आहे. त्यात मागील वेळी झालेली अतिवृष्टी, नंतर दुष्काळ आणि आता आजची गारपीट अशा तिहेरी संकटात नांदगाव तालुक्यातील माझा शेतकरी बांधव सापडला असल्याने आपण मदतीबाबत यंत्रणेला आदेश द्यावे,'' अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फोनवर बोलून केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार सुहास कांदे यांनी सोमवारी येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्यासोबत तालुक्यातील जोंधळवाडी शास्त्रीनगर व धोटाने आदी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतात जाऊन तेथील नुकसानग्रस्त शेतमालासह घरांच्या झालेल्या पडझडीची पाहणी करीत आपद्ग्रस्तांना धीर दिला.
या भागात अनेक घरांचे छत शिल्लक राहिले नाही, अशा शेतकरी व आदिवासी बांधवांची त्यांनी भेट घेतली आणि गरज पडेल त्या ठिकाणी शासकीय मदत मिळत नाही तोपर्यंत स्वखर्चातून मदत देण्याचा शब्द दिला.
''गारपिटीमुळे शेतमालाचे, जनावरांचे, घरांचे, पोल्ट्री फार्म, मका, कापूस, कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मी आपल्यासोबत असून, यंत्रणेतील अधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महायुती आपल्याबरोबर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. गारपिटग्रस्तांना मोबदला ताबडतोब मिळेल. पंचनामे सुरू असून, दोन दिवसांत पूर्ण करून, तातडीने मदत देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला या वेळी दिले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.