Jayakwadi Water Issue : 'समन्यायी'चा चुकीचा अर्थ काढून जायकवाडीला सोडलेले पाणी थांबवा - संगमनेर काँग्रेसची मागणी!

Sangamner Congress News : संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व शेतकऱ्यांनी केले आंदोलन
Sangamner Congress
Sangamner CongressSarkarnama

Ahmednagar News : महाराष्ट्र सरकारच्या समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी काॅंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व शेतकऱ्यांनी सोमवारी तीव्र आंदोलन केले.

संगमनेर बस स्थानक येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन झाले. नायब तहसीलदार लोमटे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन कायदा 2005 हा प्रामुख्याने दुष्काळी भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना समन्यायीपणे पाणीवाटप होण्याच्या उद्देशाने झालेला आहे. भंडारदरा व निळवंडे धरणातील कार्यक्षेत्रात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने या परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे हे पाणी येथील शेतकऱ्यांना देणे पहिले प्राधान्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangamner Congress
Prajakt Tanpure : जायकवाडीसाठी पाणी सोडण्यावरुन आमदार तनपुरेंचे मोठे विधान ; म्हणाले,"आमचे सरकार आल्यावर...!"

असे असताना कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडी धरणासाठी नेणे हे अत्यंत दुर्दैव असल्याचे निवेदनात म्हटले आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असून, त्या अगोदरच पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे हे पाणी तातडीने बंद करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.

बाबा ओहोळ यांनी भंडारदरा व निळवंडे धरणातील पाणी हे या भागातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी आहे. समन्यायी पाणीवाटपामधून अगोदर या भागातील दुष्काळी जनतेला पाणी दिले पाहिजे, असा अर्थ आहे. यावर्षी मराठवाड्यात आपल्यापेक्षा जास्त पाऊस झाला असून, केवळ चुकीचा अर्थ वापरून पाणी सोडण्याचे काम झाले. उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून, दर तीन वर्षांनी या आदेशाचे पुनर्विलोकन करून सूत्रात बदल करणे, अशी कार्यवाही करावी, अशी आदेश आहेत. मात्र, यामध्ये राज्य सरकारने काहीही केलेले नाही, असे म्हटले.

Sangamner Congress
Desai Vs Patankar : ''50 खोके घेऊनही ज्यांचे पोट भरले नाही, अशी मंडळी आता...'' ; सत्यजितसिंह पाटणकरांचा आरोप!

2005 च्या कायद्यातील कलम 31 अन्वये ज्या धरणांचे डेलिनेशन झालेले नाही. ती धरणे कायद्याच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. त्यामुळे जायकवाडी, भंडारदरा आणि निळवंडे हे धरणाचे अद्याप डेलिनेशन झालेली नसल्याने ते या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही हा कायदा धरणांवर लावला गेला असून, हे उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यांवर अन्याय करणारा ठरल्याचेही ओहोळ यांनी म्हटले.

Sangamner Congress
Nagar Politics : राठोडांची विखेंवर जहरी टीका; 'नगर दक्षिणचं दिवाळं काढणाऱ्यांना जनता लोकसभेला चोख हिशेब देईल'

मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, रमेश गुंजाळ, सुभाष सांगळे, विलास कवडे, निर्मला गुंजाळ, प्रा. बाबा खरात यांची यावेळी आक्रमक भाषणे झाली. सोमेश्वर दिवटे, लक्ष्मणराव कुटे, सुरेशराव थोरात, राजेंद्र गुंजाळ, संतोष हासे, विलास कवडे, नवनाथ आरगडे, राजेंद्र चकोर, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, जावेद शेख, नाना वाघ, सुनील कडलग, राजेंद्र कडलग आंदोलनात सहभागी झाले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com