नांदगाव : जमीन (Farmers) कसणाऱ्या माझ्या मायबापाला अडचणीत आणणारा मग तो खासगी (Private) कंपनीवाला असो की अजून कुणीही असो त्याच्याविरोधात मी उभा राहून लढा देईल. प्रसंगी जेलमध्येही जाण्यास तयार आहे. मात्र, अतिक्रमणात (Encroachment) किती दिवस राहायचे, याचाही विचार करण्याची वेळ आता आली आहे, असा इशारा आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी दिला. (MLA Suhas Kande assured solar affected people)
गेल्या काही महिन्यांपासून साकोरा व डॉक्टरवाडी भागातील फार्मिंग सोसायटीच्या क्षेत्रात होऊ घातलेल्या एका खासगी कंपनीच्या प्रकल्पावरून विस्थापित होणाऱ्या आदिवासी शेतमजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर आयोजित विस्थापित व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन आमदार कांदे यांच्या सूचनेवरून करण्यात आले होते.
त्यावेळी आमदार कांदे यांनी विस्थापितांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, सतीश बोरसे, अतुल बोरसे, शरद सोनवणे, प्रकाश सोनवणे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे- पाटील, वनक्षेत्रपाल कासार आदींसह साकोरा गावातील शेतकरी, आदिवासी लोकप्रतिनिधी व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आमदार कांदे म्हणाले, वनजमिनी असो किंवा अन्य महसूलशी निगडित जमिनी. केवळ कब्जात ठेवण्यापेक्षा त्या आपल्या नावावर कशा होतील, यासाठी आमदार म्हणून माझे प्रयत्न राहतील. गरज पडल्यास मान्यता मिळविण्यासाठीची परवानगी व मुख्यमंत्र्यांकडून त्यासाठी भरवायच्या नजराण्याची रक्कम खास बाब म्हणून टक्केवारी कमी करून आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. किती दिवस अतिक्रमित म्हणून राहायचे याचा विचार करण्याची आवश्यकता व्यक्त करताना आता पुढच्या पिढीसाठी विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्याची सूचना आमदार कांदे यांनी केली.
कशासाठी झाली बैठक?
साकोरा शिवारातील जुन्या सर्व्हे क्रमांक २८२ मधील साडेचार हजार एकर क्षेत्रापैकी पाचशे एकर क्षेत्रावर सौरऊर्जेशी निगडित एका खासगी कंपनीचा विद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्रीचे व्यवहार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरसकट जमिनी ताब्यात घेण्यावरून गेल्या काही दिवसांपासून विवाद सुरु आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली. सदर क्षेत्रावर जमिनी कसणारे आणि जमिन नावावर असणारे यावरून हा वादंग उभा राहिला आहे. या क्षेत्रात वर्षानुवर्षे असलेल्या कब्जेदारांच्या ताब्यात असलेले क्षेत्र नावावर झाले नाही असे, मात्र सध्या विस्थापित होऊ पाहणारे आणि विक्री व्यवहार झालेले असा हा एकूण विवादाचा मुद्दा या बैठकीत चर्चिला गेला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.