Dada Bhuse; भुसेंच्या मतदारसंघात पेटला पाण्यासाठी नागरिकांतच संघर्ष

झोडगे येथे पाण्यासाठी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची भाषा
Agitation on Highway at Zodge
Agitation on Highway at ZodgeSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : (Malegaon) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात गेले काही दिवस बोरी-आंबेदरी जलवाहिनी (Water pipeline)प्रकल्पाच्या पाण्यावरून संघर्ष पेटला (Conflict) आहे. मतदारसंघातील दोन विभागातील नागरिक रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. त्यात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करण्याची भाषा होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात पेटलेले आंदोलन थांबणार कसे? याची चर्चा आणि चिंता आहे. (Two parts of people came in face to face on water Pipeline issue)

Agitation on Highway at Zodge
Central Government : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; राज्यसभेत भाजप व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

बोरी- आंबेदरी बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प झालाच पाहिजे. हा प्रकल्प फक्त झोडगे नव्हे तर माळमाथ्यासाठी वरदान आहे. मुठभर लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. प्रकल्पासाठी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढू, असा निर्धार करीत झोडगे व पंचक्रोशीतील गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्गावरील झोडगे येथे रास्तारोको आंदोलन केले. झोडगे गावातही कडकडीत बंद पाळण्यात आला.

Agitation on Highway at Zodge
Inflation : सामान्यांना दिलासा ! किरकोळ महागाई दरात घसरण कायम

पालकमंत्री दादा भुसे यांनी दुरध्वनीवरुन जलवाहिनीचे काम लवकरच सुरु होईल, असे आश्‍वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.

याच विषयावरून प्रकल्पालगतच्या गावांत देखील गेले काही दिवस धरणे आंदोलन सुरु आहे. यातील एका आंदोलनकाने विषप्राशन केल्याने हा विषय़ गंभीर वळणावर पोहोचला आहे. झोडगे येथे सोमवारी झालेल्या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. झोडगेसह अस्ताने, लखाणे, राजमाने, जळकू, कंधाणे येथील शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘समान न्याय झालाच पाहिजे’, ‘बंदिस्त जलवाहिनी झालीच पाहिजे’, ‘अभी नही तो कभी नही’ आदी घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी महामार्ग परिसर दणाणून सोडला. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

या वेळी भाजपच्या माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, माजी सरपंच दीपक देसले, माजी उपसरपंच नथु देसले, अस्तानेचे सरपंच अविनाश शिरसाठ, भाजपचे विजय देसाई, दीपक पवार, संजय कदम, योगेश देसले, शिवसनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण देसले, दिनकर देसाई, निळकंठ सोनजे, शरद देसले, सरपंच चंद्रकला सोनजे, उपसरपंच बेबाबाई देसले, किशोर देसले, प्रदीप देसले, ज्ञानेश्‍वर देसले, बंटी देसले, दीपाली भामरे, प्रदीप देवरे, धर्मा पवार, लखाणे येथील डॉ. साहेबराव इंगळे, गोरख देवरे, सुभाष गिल, परेश सोनवणे आदींची भाषणे झाली. त्यांनी बंदिस्त जलवाहिनीला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली. आंदोलनकर्त्यांनी विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. झोडगे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, तहसीलदार कैलास पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार यांनी सुरवातीला आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलनकर्ते जलवाहिनीचे काम सुरु करा, या मागणीवर ठाम होते. अखेर श्री. भुसे यांनी माजी सरपंच दीपक देसले यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जलवाहिनीचे काम होईल. रास्तारोको मागे घ्यावा, अशी विनंती केली. त्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यापूर्वी याच मागणीसाठी १८ नोव्हेंबरला रास्तारोको आंदोलन करण्यात आला होता. त्यावेळी पाटबंधारे विभागाने आठ दिवसात काम सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. त्याची आंदोलनकर्त्यांनी आठवण करुन दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com