MLA Suhas Kande with Minister Anil Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drought Politics : अखेर नांदगावला दुष्काळ जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला!

Sampat Devgire

MLA Suhas Kande : राज्यातील अनेक तालुके दुष्काळाग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात या तालुक्यांचा फेरआढावा घेण्यात आला. (State Government take review of drought situation of Maharashtra)

राज्याचे (Maharashtra) पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत दुष्काळी (Drought) स्थितीचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी नाशिकच्या (Nashik) नांदगाव मतदारसंघाचा यादीत समावेष व्हावा यासाठी आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी अक्षरशः तालुक्याची वकिली केली.

नांदगाव हा पारंपरिक दुष्काळी मतदारसंघ आहे. मात्र, यंदा केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत त्याचा समावेश नव्हता. नाशिक जिल्ह्यातील केवळ मालेगाव, येवला आणि सिन्नर या तीन तालुक्यांच्या यादीत समावेश झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. राज्य शासनाने लावलेल्या निकषांबाबत मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

याबाबत आज मंत्री अनिल पाटील यांच्या दालनात दुष्काळी स्थितीचा फेर आढावा घेण्यात आला. या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांसह विविध मंत्री उपस्थित होते. या वेळी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांनी तेथील परिस्थितीचा अहवाल सादर केला.

नांदगाव मतदारसंघाचे आमदार कांदे यांनी स्वतः मंत्र्यांपुढे मतदारसंघातील स्थितीसादर केली. नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम जनतेवर होतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मंत्र्यांनी नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचे आश्वासन दिले. आज त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

नांदगाव तालुक्यात शिवसेना (ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रश्नावर आंदोलन सुरू केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य शासनाला पत्र लिहिण्याची मोहीम सुरू करण्यात आली. अजित पवार गटासह काँग्रेसनेही राज्य शासन व स्थानिक आमदारांविरोधात टीका केली होती. त्यामुळे तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत आमदार कांदे यांच्यावर दबाव होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT