MLC Satyajeet Tambe in Local train Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe News : सत्यजीत तांबे का म्हणाले, मुंबईकरांविषयी प्रचंड आदर, ते किती सहनशील!

Sampat Devgire

Mumbai Traffic congestion : नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी नवी नाही. पावसाळ्यात तर हमखास प्रत्येकालाच त्याचा अनुभव येते. सोमवारी आमदार सत्यजीत तांबे तीन तास वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना लोकल ट्रेनचा पर्याय निवडावा लागला. (MLC Satyajeet Tambe stuck in Nashik-Mumbai Traffic on Monday)

पावसाळी अधिवेशनासाठी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) नाशिक-(Nashik) मुंबई महामार्गाने मुंबईला (Mumbai) निघाले होते. भिवंडी नाका येथे तो वाहतूक कोंडीत अडकले. या अनुभवानंतर ते म्हणाले, मुंबईच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढला. ते किती सहनशील आहेत.

याबाबत आमदार तांबे यांनी स्वतःच ट्वीट करून आपला लोकलने प्रवास केल्याचा फोटो शेअर केला आहे. सामान्यतः पावसाळी वातावरणात अनेकांना कल्याण, भिवंडी नाक्यावर वाहतूक कोंडीचा अनुभव हमखास येतो. त्यात सोमवारी सायंकाळी आमदार तांबे अडकेल होते. त्यामुळे त्यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्यास विलंब झाला.

याबाबत आमदार तांबे यांनी ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो.

शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय.

खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघर पासून पनवेल पर्यंत तर कल्याण-डोंबिवली पासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे. मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐंशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT