Raj Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 'त्या' भूमिकेनंतर नाशिकमध्ये मनसेने घेतले नवे आंदोलन हाती

MNS Godavari Pollution Protest Nashik :गोदावरी प्रदूषणाविरोधात मनसेने दंड थोपटले असून गोदावरी नदी बचाव मोहीम राबविण्यात येणार आहे.

Ganesh Sonawane

MNS Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुडीपाढवा मेळाव्यात देशातील आणि राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा विषय मांडल्यानंतर नाशिकच्या मनसैनिकांनी आता नवं आंदोलन हाती घेतलं आहे. गोदावरी प्रदूषणाविरोधात मनसेने दंड थोपटले असून गोदावरी नदी बचाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मनसेच्या वतीने बुधवारी (ता. ९) रामकुंडात उतरुन आंदोलन करण्यात येणार आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी देशातील एकही नदी स्वच्छ नसल्याचं म्हटलं होतं. त्याआधी त्यांनी प्रयागराजमधील पाणी प्राशन करणार नसल्याची भूमिकाही घेतली होती. त्यांच्या या भूमिकेवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार त्यांनी गुढीपाडवा मेळाव्यात घेतला होता.

राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणा संदर्भात घेतलेल्या या भूमिकेनंतर नाशिकमधील मनसे सैनिकांनी गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील तसेच सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, अंकुश पवार यांनी यासंदर्भात सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी पक्षाची गोदावरी नदी प्रदुषणाबाबतची भूमिका जाहीर केली आहे. ते, म्हणाले गोदावरी नदीची ओळख जगभर आहे. मात्र गोदावरी नदी प्रदूषित झाली आहे. प्रदूषणामुळे नाशिकचे नाव बदनाम होत आहे. गोदावरी स्वच्छतेच्या नावाखाली केवळ करोडो रुपये खर्च केले जातात मात्र प्रत्यक्षात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याउलट प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

नाशिकमध्ये २०२७ मध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी साधू-महंत नाशिकमध्ये येणार आहेत. या भाविकांनी गोदावरीतील प्रदूषित पाण्यात स्नान करायचे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच गोदावरी नदीच्या परिसरात अतिक्रमण होत आहे. उद्योग व्यवसायातील काही बलाढ्य लोकांकडून कारखान्यातील दूषित पाणी गोदावरीत सोडण्यात येते. ज्या गोदावरीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले जाते, त्याच नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. हेच प्रदूषित पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जात असल्याने शेत जमीन नापीक झाली आहे. कंपन्यांचे दूषित पाणी, गटारीचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यास मनाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रदूषणासंदर्भात तक्रार करुनही स्थानिक प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पाण्यासाठी त्रास झाल्यास शासन यंत्रणा जबाबदार राहील. असा इशारा देतानाच गोदावरी नदी प्रदूषणावर प्रशासन गंभीर नसल्याचा दावा मनसेनं केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT