Devendra Fadnavis District Bank: मुख्यमंत्री फडणवीस, कृषिमंत्री कोकाटे यांच्या जिल्हा बँकांना सहकार आयुक्तांनी दिली शेवटची संधी!

Maharashtra Cooperative Bank Issues: राज्यातील चार जिल्हा बँकांना सहकार आयुक्तांनी कर्जवसुलासाठी कडक धोरण राबविण्याच्या सूचना केल्या.
Devendra Fadanvis | Ajit Pawar
Devendra Fadanvis | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

District Bank Final Notice: राज्यातील चार जिल्हा बँका अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. या बँकांचे बँकिंग लायसन केव्हाही रद्द होऊ शकते, अशी भिती आहे. त्यामुळे या बँका आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी कठोर भूमिका घेणार आहेत.

थकबाकीमुळे जिल्हा बँका अडचणीत आहेत. यामध्ये नाशिक, धाराशिव, नागपूर आणि बीड या जिल्हा बँका संकटात आहेत. सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी या संदर्भात काल बैठक घेतली. या बैठकीत बँकांच्या आर्थिक कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला.

Devendra Fadanvis | Ajit Pawar
Karan Gaikar Politics: हजारो कोटींच्या घोटाळ्यात अजित पवार सुटतात, मग कर्जमाफी का होत नाही?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात नागपूर जिल्हा बँक वाचविण्यासाठी हस्तक्षेप केला होता. या बँकेचे प्रशासन राज्य सहकारी बँकेकडे सोपविण्यात आले होते. नागपूर जिल्हा बँक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्ह्याची संबंधित आहे. त्यामुळे त्यात मुख्यमंत्र्यांची ही प्रतिष्ठा कोणाला लागली आहे.

Devendra Fadanvis | Ajit Pawar
Raj Thackeray Politics: मनसेचे आता थेट रामकुंडावर आंदोलन, कुंभमेळ्याच्या नावाखाली महापालिकेची केवळ करमणूक!

सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात या चार बँकांच्या प्रतिनिधी समवेत बैठक झाली. या बैठकीत थकबाकी वसुलीसाठी ३० जून पर्यंत मुदतवाड देण्यात आली आहे. यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या थकबाकीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा बँका गावपातळीवर विविध कार्यकारी सेवा संस्थांना कर्ज पुरवठा करतात. या संस्था शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे कर्ज वसुलीची जबाबदारी या सोसायट्यांच्या राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांवर देखील आहे. मात्र या संस्थांच्या संचालक मंडळांनी त्यात गांभिर्याने काम केलेले नाही.

सहकार सचिव दराडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप सिंग चव्हाण, विभागीय सहकार निबंधक संभाजी निकम, व्यवस्थापकीय संचालक अरविंद शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एनपीए असलेल्या संस्थांचा आढावा घेण्याचे काम काल रात्रभर करण्यात आले. सकाळी याबाबत जिल्हा बँकांनी आढावा घेऊन पुढील कारवाईला वेग देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या चारही बँकांनी शासनाकडे अर्थसहाय्य मागितले आहे. नाबार्ड कडून या बँकांना बँकिंग परवाना देण्यात आला आहे. निकष पूर्ण न केल्याने हा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने आता सहकार प्रशासनही सक्रिय झाले आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकारी आणि राजकीय नेत्यांकडे वसुलीसाठी आता प्रशासन हंटर घेऊन उभे राहणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com