Amit Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amit Thackeray News : नाशिकचा गणपती अमित ठाकरेंना पावेल का?

Sampat Devgire

Nashik MNS News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा नाशिक बालेकिल्ला बनविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी युवा नेते अमित ठाकरे यांनी आज पस्तीस मंडळांना भेटी दिल्या. यानिमित्ताने पक्षाची ही लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याने नाशिकचा गणपती अमित ठाकरे यांना पावणार का? अशी चर्चा आहे. (MNS leader Amit Thackeray preparing a Loksabha election through Ganesh Festiwals)

मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांसह (Election) पक्षाच्या विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.

पुढील वर्षी एप्रिल व मे महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार आहे. निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेने पुन्हा मान ठोकण्याची तयारी केली आहे. त्यासाठी युवा नेते अमित ठाकरे सातत्याने नाशिकचा दौरा करत आहेत.

मागील महिन्यात नाशिक जिल्ह्यात महासंपर्क अभियान त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले. या अभियानामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याबरोबरच काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.

लोकसभा मतदारसंघातील नाशिक शहरातील चारही मतदारसंघ व सिन्नर तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांना ते भेटी देणार आहेक. काही ठिकाणी आरती करतील तर काही ठिकाणी देवदर्शन करून पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील.

नाशिक रोड, इंदिरानगर, अंबडगाव, सिडको, गंगापूर रोड या भागातील १६ गणेश मंडळांना ते भेट देतील. बुधवारी सिन्नर, सातपूर, मखमलाबाद, देवळाली, भगूर, पळसे या भागातील १९ गणेश मंडळांना भेटी देतील. अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. याच माध्यमातून ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.

अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण या भागाकडे स्वतः लक्ष देत आहेत. नाशिकमध्ये अमित ठाकरे हे संघटना बांधणीबरोबरच शहरातील महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेऊन संपर्क वाढवत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT