BJP ON Gholap: मुलीनंतर भाजपने फेकले माजी मंत्री घोलप यांच्यावर जाळे!

After Daughter, BJP threw a net for the disgruntled Babanrao Gholap-चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बबनराव घोलप यांच्यासाठी भाजपचे दार केव्हाही खुले आहेत.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News : माजी मंत्री बबनराव घोलप यांची मुलगी तनुजा भोईर यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेत नाराज असलेल्या घोलप यांच्यावर जाळे टाकले आहे. (Chandrashekhar Bavankule given standing offer to join bjp for Babanrao Gholap)

शिवसेना (Shivsena) उपनेते, माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) सध्या पक्षात नाराज आहेत. या संधीचा लाभ घेत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी त्यांना ऑफर दिली आहे.

Chandrashekhar Bavankule
BJP Nashik News : उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याला पवार, ठाकरेंचे समर्थन आहे काय?

देवळाली विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सय्यद पिंप्री गावात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शिवसेनेचे उपनेते घोलप यांना पक्षाचे दार खुले असल्याचे सांगत पक्षात येण्याचे थेट निमंत्रण दिले. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिकमध्ये सुरुंग लावण्याचे प्रयत्न होत असल्याचे मानले जाते.

घोलप यांच्या कन्या व भाजपच्या तनुजा घोलप-भोईर यांच्या सय्यद पिंप्री येथील संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्यांनी घोलप यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की घोलप आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही. हा निर्णय घोलप यांनी घ्यायचा आहे. आम्ही कुणाला आमच्या पक्षात या, असे म्हणत नाही.

घोलप यांचे पुत्र योगेश यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. बबनराव घोलप यांनीही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

घोलप यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी घोलप यांच्या कन्या तनुजा यांच्या सय्यद पिंप्री येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनाचे निमित्त साधून घोलप यांना अप्रत्यक्ष भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रमास पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले, तसेच ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते.

Chandrashekhar Bavankule
Dhule ACB News: PWD च्या अभियंत्याने वीस हजारांसाठी कंत्राटदाराला अक्षरशः छळले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com