Raj Thackeray sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MNS Politics : मनसे कार्यकर्त्यांना बोगस मतदार शोधून काढण्याचे आदेश, निवडणुकांपूर्वी घोळ बाहेर काढणार

Raj Thackeray MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावरून निवडणुक आयोगाला आव्हान दिले आहे. मविआ नेत्यांसोबत राज ठाकरेंनी देखील हा मुद्दा आता चांगलाच लावून धरला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावरून निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरले असून कान टोचले आहेत. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असं निवडणुक आयोगाला राज ठाकरेंनी सुनावलं. मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे घोळ आहे हे दाखवत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला अशी मागणी केली आहे.

आतातर 1 नोव्हेंबरला विरोधी पक्ष मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी होणार आहे. 'न भूतो न भविष्यती' असा मोर्चा झाला पाहीजे असे आदेशच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी मनसे सैनिक कामाला लागले आहेत.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेचा मतदार याद्यांवर खास फोकस राहणार आहे. त्यादृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने जळगावात पक्ष नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमधील पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्याने मतदार यादी नीट तपासावी. त्यातील दुबार नावे व अनियमितता शोधून काढा असे आदेश मनसे नेते व माजी आमदार बाविस्कर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी आणि निवडणुकीबाबतची रणनिती यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील मतदार याद्यांचे व्यवस्थित अवलोकन करावे. दुबार नावे, बोगस मतदार तसेच याद्यांमधील अनियमितता शोधून काढावी. कुठे काही घोळ आढळल्यास त्याची माहिती तत्काळ जिल्हास्तरावर द्यावी असे निर्देश यावेळी नेते बाविस्कर यांनी दिले.

मनसेच्या जळगावातील कार्यकर्त्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. राज्यपातळीवर देखील अशा स्वरुपाचे आदेश मनसेकडून कार्यकर्त्यांना दिले जातात का हे आता पाहावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे क्लीअर होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी मनसेने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT