Dinkar Patil & Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: शेतकरी कर्जमाफीसाठी मनसे उतरणार मैदानात, भाजपची डोकेदुखी वाढणार!

MNS Politics; Raj Thackeray's new ally Dinkar Patil is protesting for loan waiver-मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नव्या दमाचे शिलेदार दिनकर पाटील उद्या नाशिक शहरात रस्त्यावर उतरणार!

Sampat Devgire

Dinkar Patil News: नाशिक शहरात मनसे नव्या दमाने कामाला लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सक्रिय झाला आहे. यासंदर्भात उद्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते आणि सातत्याने चर्चेत राहणारे दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला जय श्रीराम केला आहे. आता ते मनसेत दाखल झाले आहेत. नव्या पक्षात येतात त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सध्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यभरात शेतकरी आणि विविध संघटना या विषयावर आक्रमक झाल्या आहेत. आता मनसे देखील मैदानात उतरली आहे. यातून सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसातच दिनकर पाटील यांनी विविध उपक्रम आणि आपल्या आक्रमक शैलीत प्रशासनाविरोधात आंदोलन केले. त्यामुळे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना थेट सरचिटणीस हे पद दिले आहे. त्यामुळे दिनकर पाटील यांनी पक्ष पुन्हा एकदा सक्रिय करण्यावर भर दिला आहे.

शुक्रवारी नाशिक शहरात मनसेचे कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी दिनकर पाटील यांनी गेले काही दिवस तयारी केली आहे. उद्याच्या आंदोलनात मनसे आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या विषयावर महायुतीचे सरकार चांगलेच बॅकफुटवर येण्याची शक्यता आहे.

मनसेचे नाशिक शहरातील आंदोलन प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. महापालिका हे मनसेचे मुख्य लक्ष्य आहे. त्या दृष्टीने मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन होत आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. त्या दृष्टीने उद्याच्या आंदोलनात दिनकर पाटील यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा विषय सध्या चर्चेत आहे. मनसेने ही दुखरी नस हेरली आहे. त्यामुळे मनसेचे नव्या दमाचे नेते दिनकर पाटील काय राजकीय डावपेच आखतात याला महत्त्व आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT