Ajit Pawar Politics: शेतकरी कर्जमाफीचा फास सरकारच्या गळ्याला...अजित पवार होणार टार्गेट?

Government Under Pressure Over Loan Waiver: कर्जमाफीच्या आश्वासनावर राज्य सरकार घुमजाव करीत असल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar and Loan Waiver Politics: शेतकरी कर्जमाफी हा विषय गंभीर वळणावर पोहोचला आहे. शेतमालाचे भाव सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. राज्य शासनाकडून कर्जमाफी होईल ही अशा आता फोल ठरली आहे.

या संदर्भात शेतकरी संघटनेची बैठक नाशिक येथे झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करण्याच्या आश्वासन सरकारने दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निवडणुकीत आश्वासन दिल्याचा दावा देखील संघटनांनी केला आहे. आता मात्र राज्य शासनाने या विषयावर घुमजाव केले आहे. त्यावरून संघटनांनी नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar
Shivsena UBT Politics: जळगावच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी गटबाजी वरून खडसावले!

राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही तर तो दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत जाणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभे करण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे, असे यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Ajit Pawar
Eknath Khadse Politics: एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडली, गिरीश महाजनांपुढे दिल्लीचेही पान हालेना?

विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना तोंड भरून आश्वासने दिली होती. त्यात कर्जमाफी करण्याच्या आश्वासन देखील दिले होते, असा दावा या नेत्यांनी केला. आता उपमुख्यमंत्री पवार हे तातडीने कर्ज भरावे असे सांगत आहे. ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

लाडकी बहीणसह अनेक योजनांची घोषणा केलेले राज्य सरकार सध्या आर्थिक संकटात सापडले आहे. अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. या सर्व आर्थिक समस्यांची जाणीव अजित पवार यांना सर्वाधिक आहे. त्यातूनच त्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे आवाहन केले असावे.

मात्र या वक्तव्यावरून राज्यभरातील सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्या विषयी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यकारभार हकताना मुख्यमंत्री या सर्व वादांपासून अलिप्त राहण्याची शक्यता आहे. उपस्थितीत शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे टार्गेट अजित पवार हेच असतील. त्यामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com