Nashik News: 'महाआघाडीत कोण कोठे लंवडेल सांगता येत नाही', या एका वाक्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाआघाडीत सामील होण्याचा मुद्दाच फेटाळून लावला. आगामी लोकसभा निवडणुकींसाठी आपली चाचपणी सुरू असून, आवश्यक त्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. (Raj Thackeray On MVA and Loksabha Election 2024)
राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्यासाठी निमंत्रण देणार का, असा प्रश्न शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांना कालच्या दौऱ्यावेळी विचारण्यात आला होता. त्यावेळी ही लढाई लोकशाही आणि संविधान वाचविण्याची असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. तसेच संविधान वाचविण्यासाठी निमंत्रणाची आवश्यकता नाही. राज ठाकरे यांना वाटले तर ते महाआघाडीत येऊ शकतात, असेही राऊत यांनी स्पष्ट केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याच मुद्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महाआघाडीत सामील होणार काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी महाआघाडी कधी कुठे लंवडेल, नेम नाही, असे सांगितले. नितीश कुमार महाआघाडीत आले होते ना, गेलेत ना परत, असे म्हणत मनसेची लोकेसभेसाठी एकला चलो रेची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले.
लोकसभेला अद्याप अवकाश आहे. त्यामुळे सध्या चाचपणी सुरू केली आहे. नाशिकच नाही तर शिर्डी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघाचा आढावा सध्या सुरू आहे. निवडणूक लवढवणारच का, कुठे लढवणार या बाबी स्पष्ट होण्यास अद्याप अवकाश असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी सत्तेचा अमरपट्टा सोबत घेऊन आलेले नाहीत. आज ते ईडी व प्रशासकीय यंत्रणाचा वापर करीत कारवाई करीत आहेत. उद्या सत्ता बदल झाला की सत्तेत येणारे तेच करतील. भाजपला हे राजकारण परवडणार नाही. इंदिरा गांधींनी काय केले, याचे दाखले दिले जातात. इतिहासात कोणी चुकलं म्हणजे आपण आता चुका करीत सुटायचे का, असा सवाल करीत ठाकरे यांनी भाजपचे कान उपटले.
(Edited By-Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.