Interim Budget 2024 : केंद्र सरकारच्या बजेटवर आमदार मामा-भाच्याची टीका

Balasaheb Thorat, Satyajeet Tambe On Budget : केंद्र सरकारचे बजेट म्हणजे हरलेल्या डावाचा जयजयकार..!
Balasaheb Thorat, Satyajeet Tambe
Balasaheb Thorat, Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल देशाचे अंतरिम बजेट सादर केले. त्यावर विरोधकांनी सडकून टीका सुरू केली आहे. 57 मिनिटांच्या बजेटमध्ये 43 मिनिटे मोदी सरकारने 10 वर्षांत काय केले, याचा पाढा वाचण्यात आला. शिवाय लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने काही मोठ्या घोषणा केल्या. त्यानंतर नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे या मामा-भाचांनी बजेटवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Balasaheb Thorat, Satyajeet Tambe
Nirmala Sitharaman Speech : सीतारमण यांनी सांगितली 'GDP' ची नवी व्याख्या!

महागाईवर उपाययोजना नसलेले हे बजेट असून सत्ताधारी हरले आहेत. पण, मीडियाच्या साह्याने हरलेल्या डावाचा जयजयकार करत आहेत, अशी टीका बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. तर 'नकारात्मक गोष्टींना आकडेवारींनी झाकलेले बजेट' या शब्दांत आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी हल्लाबोल केला आहे.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, देशातील मध्यमवर्ग महागाईने होरपळतो आहे. अशावेळी केंद्र सरकारने बजेटमधून (Interim Budget 2024) त्यांना दिलासा द्यायला हवा होता. पण या बजेटमधून कोणताही दिलासा मिळालेला नाही. महागाईवर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना कोणतीही मदत नसणारे हे बजेट पूर्णपणे निराशाजनक आहे. सत्ताधारी हरलेल्या डावाचा मीडियाच्या मदतीने जयजयकार करत आहेत, अशी टीका थोरातांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे हे बजेट घोर निराशाजनक आहे. केंद्र सरकारच्या बजेटवर शेअर बाजारामधील घडामोडी अवलंबून असतात. मात्र यावेळेस शेअर बाजार पूर्णपणे ठप्प आहे, असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'संपूर्ण मध्यमवर्ग महागाईमध्ये होरपळत आहे. अशा वेळेस त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. भरमसाठ वाढलेल्या महागाईवर सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. शेतकऱ्यांना मदत केली, असे सांगतात. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही. राज्यांच्या हक्काचे निधी केंद्र सरकारकडे थकलेले आहेत. त्यातून राज्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे या राज्यांना प्रगती करणेसुद्धा अवघड जाणार आहे, याकडेही आमदार बाळासाहेब थोरात यांनी लक्ष वेधले आहे.

नकारात्मक आकडेवारी झाकली - सत्यजीत तांबे

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतरिम बजेट मांडतांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दहा वर्षांतील सकारात्मक आकडेवारी जाणीवपूर्वक मांडली. त्याचवेळी नकारात्मक आकडेवारी झाकण्याचे राजकीय चातुर्य दाखवल्याची टीका अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. कोणतीही ठोस नवी घोषणा न करता या आधीच्या योजनांचे यश मांडत अर्थमंत्र्यांनी मिळालेल्या संधीचे उत्तम सोने केले आहे.

नवीन हॉस्पिटल, कॉलेज, नव्या योजना अशा घोषणा कोणत्याही पक्षाच्या प्रत्येक अर्थसंकल्पात होतात. त्याची अंमलबजावणीही कमी जास्त प्रमाणात होतच असते. मात्र निवडणूक असूनही कर पद्धतीची पुनर्रचना, विशिष्ट घटकांसाठी भरघोस तरतूद अशा कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करता, समतोल अर्थसंकल्प मांडला गेला आहे.

यातूनच निवडणुकांना सामोरे जाताना सरकारचा राजकीय आत्मविश्वास दिसून येतो. आता हा आत्मविश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे काळच ठरवेल, असा टोला आमदार सत्यजीत तांबे यांनी लगावला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Balasaheb Thorat, Satyajeet Tambe
Budget 2024 Updates: निवडणुकीचे वर्ष तरीही इन्कम टॅक्स जैसे थे; मोदी सरकारचा आत्मविश्वास वाढला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com