Raj Thackeray and Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नाशिकमध्ये होणार 'या' पक्षांची अडचण?

Nashik News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नाशिक शहरात राजकीय गणिते नव्याने मांडली जाण्याची शक्यता आहे. आधीच 'हाऊसफुल' झालेल्या महायुती पुढे नवी समस्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sampat Devgire

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया विदर्भ वगळता महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलवू शकते. ठाकरे युतीच्या प्रचार तंत्रामुळे भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील बॅकफूटवर जाण्याची चिन्हे आहेत.

नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रे गिरीश महाजन यांच्याकडे आहेत. गिरीश महाजन यांनी नाशिकच्या राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी महापालिकेत 100 प्लस अशी घोषणा केली आहे. त्यासाठी भाजप जो जो पक्षात येईल त्याचे स्वागत करण्यास तयार आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने गेले काही दिवस शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला अडचणीत आणण्यासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी निवडणुकीआधीच अनेकांना मुबलक प्रमाणात सरकारचा निधी वाटला जात आहे. यामुळे शिवसेनेतील जवळपास 25 माजी नगरसेवक एकनाथ शिंदे पक्षात दाखल झाले आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेत काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी आणि ठाकरे पक्षाचे 33 माजी नगरसेवक सध्या निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार आहेत. त्यांनी उमेदवारी मिळेल या एकमेव अपेक्षेने या पक्षात प्रवेश केला आहे. या सर्व उमेदवारांना महायुती एकत्र हवी आहे.

मावळलेल्या नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे 65 नगरसेवक होते. शिवसेनेचे 30 हून अधिक नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेचे प्रत्येकी पाच नगरसेवक होते. ही संख्याबळ लक्षात घेतल्यास आगामी निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला उमेदवारी देताना विचारपूर्वक उमेदवारांची निवड करावी लागेल.

सध्या महायुतीत जवळपास शंभरहून अधिक विद्यमान अर्थात माजी नगरसेवक आहेत. सर्वांना उमेदवारी हवी आहे. याशिवाय भाजपकडे अनेक प्रबळ इच्छुक आहेत. यामध्ये उमेदवारी देताना हमखास गोंधळ होईल. नाराजी वाढेल. परिणामी मनसे आणि शिवसेना युतीकडे आयते उमेदवार उपलब्ध होतील. यामध्ये भाजपचे 100 प्लस हे गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होते. त्या गर्दीला उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक फळीची जोड मिळाल्यास चित्र बदलू शकते. त्याचा जनमानसावर मोठा परिणाम होईल. विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडल्याने सत्ताधारी पक्षाला मतदारांची नाराजी अडथळा आणू शकते. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नाशिक महापालिकेत किमान विरोधी पक्षांचा स्पेस ठाकरे बंधूंना मिळू शकेल, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT