Rinku Singh Priya Saroj Engagement: महुआ मोइत्रांनतर आणखी एक खासदार बांधणार लगीनगाठ! जया बच्चन, अखिलेश यादव राहणार उपस्थित

Rinku Singh Gets Engaged to SP MP Priya Saroj: रिंकू अन् प्रिया यांची ओळख त्यांच्या एका मित्रामुळे झाली. त्यांची भेट होत गेली, अन् सहवासाच्या वेलीवर प्रीतीचं फूल कधी उमलयं हे कळलचं नाही. पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा होणार आहे.
Rinku Singh Gets Engaged to SP MP Priya Saroj
Rinku Singh Gets Engaged to SP MP Priya SarojSarkarnama
Published on
Updated on

Rinku Singh and Priya Saroj Engagement: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय,तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी नुकतेच गुपचूप लग्न केल्यानंतर आता आणखी खासदार लगीनगाठ बांधणार आहे.

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी लखनौमधील पंचतारांकित हॉटेल द सेंट्रम मध्ये सुरु आहे. रिंकू सिंह अन् प्रिया सरोज आज एकमेकांना अंगठी घालणार आहेत.

या अंगठ्यांची किंमत (प्रत्येकी) सुमारे अडीच लाख रुपये असल्याची माहिती आहे. या सोहळ्यासाठी दोघांनीही खास पोशाख नामांकित ड्रेस डिझाइनरकडून तयार करुन घेतला आहे. राजकारण आणि क्रिकेटमधील अनेक सेलिब्रेटी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे.

अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या, राजकारण आणि क्रिकेट मधील हा हायप्रोफाईल लग्नसोहळा लवकरच होणार आहे.

फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेल्या हॉलमध्ये रिंग सेरेमनीची तयारी सुरु आहे. सभागृहात खुर्च्या लावण्यात आल्या असून खुर्च्यांवर पांढऱ्या रंगाचे कापड आणि पिवळ्या फितीही लावण्यात आल्या आहेत. भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. क्रिकेटरच्या निवासस्थानासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या अनेक टीम याठिकाणी मुक्कामाला असतात.

Rinku Singh Gets Engaged to SP MP Priya Saroj
Noshaba Shehzad: ही आहे पाकिस्तानी गुप्तहेरांची 'आका'; 'मॅडम एन' ने 500 युट्यूबरला ओढलं जाळ्यात

जया बच्चन,अखिलेश-डिंपल सहित अनेक जणांची उपस्थिती

क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांच्या हायप्रोफाईल रिंग सेरेमनीसाठी प्रिया सरोज यांचे कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे नातेवाईक गोमतीनगर येथील त्यांच्या घरी आले आहेत. रिंकू सिंहचे कुटुंबीय रविवारी लखनौला पोहोचले आहेत. दोन्ही कुटुंबियांकडून तयारी पूर्ण झाली आहे.

Rinku Singh Gets Engaged to SP MP Priya Saroj
NCP News: 'त्या' सात आमदारांमुळे अजितदादांच्या स्वप्नाला खीळ; 2 वर्षांपासून केलेले प्रयत्न ठरले व्यर्थ

या हायप्रोफाइल रिंग सेरेमनी सोहळ्यासाठी अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन यांच्यासमवेत 300 अधिक विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 18 नोव्हेंबर रोजी वाराणसी येथील हॉटेल ताज येथे हा शाही विवाह सोहळा होणार असल्याची माहिती प्रिया यांचे वडील तुफानी सरोज यांनी दिली. दोन्ही कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर हा लग्नाला परवानगी देण्यात आली, असे तुफानी सरोज यांनी सांगितले.

प्रीतीचं फूल...

रिंकू आणि प्रिया यांची ओळख त्यांच्या एका मित्रामुळे झाली. त्यांची भेट होत गेली, अन् सहवासाच्या वेलीवर प्रीतीचं फूल कधी उमलयं हे कळलचं नाही. पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा होणार आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (वय ५०) यांनी जर्मनीत बिजू जनता दलाच्या नेत्यासोबत लग्न केले आहे. माजी खासदार पिनाकी मिश्रा (वय 66)असे त्यांचे नाव आहे. या विवाहाचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता खासदार प्रिया सरोज यांचा विवाह होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com