Raj Thakrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरेंनी कौतुक केलेले सलीम शेख बाद, शिवसेनेची मात्र चंगळ!

नाशिक महापालिकेत महिला आरक्षण सोडतीने भाजप नेत्यांना सक्तीची विश्रांती तर शिवसेनेला झाले मैदान मोकळे.

Sampat Devgire

नाशिक : मशिदीवरील (Mosque Speakers) भोंगे प्रकरणात राज ठाकरे (Raj Thakrey) यांची हिरीरीने पाठराखण करणारे मनसेचे नगरसेवक सलीम शेख, (Salim Shaikh) योगेश शेवरे यांचे प्रभाग महिला आरक्षीत झाले. भाजपच्या (BJP) महापौर, स्थायी समिती सभापतीतसेच विविध नेत्यांना सक्तीची विश्रांती मिळाली. शिवसेनेचे (Shivsena) विद्यमान तसेच इच्छुकांना मात्र मैदान मोकळे झाले आहे. त्यामुळे नेत्यांत कही खुशी कही गम असे वातावरण आहे. (Womens reservation close down MNS salim Shaikh political door)

शहरातील सातपूर विभागात मनसेचे सलीम शेख व योगेश शेवरे यांना विस्थापित व्हावे लागणार आहे. यापूर्वी प्रभागाचे तुकडे झाल्याने आधीच घाम फुटला होता. त्यात आरक्षणाने त्यांच्या विस्थापनावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता शेख यांना नवा प्रभाग शोधावा लागेल. कदाचीत ते प्रभाग १५ मधून शेख उमेदवारी करू शकतील.

शेवरे यांना पुरुष जमाती गट नसल्याने अन्यत्र शोध घ्यावा लागेल. १६ मध्ये दोन्ही खुले गट खुला प्रवर्ग असल्याने प्रियांका घाटे यांना राखीव गट राहिला नाही. काँग्रेसचे समीर कांबळे हे ज्या भागात वास्तव्याला आहेत तो शरणपूर गावठाण प्रभाग नऊला जोडला गेला असल्याने यापूर्वी त्यांच्या विस्थापितेवर शिक्कामोर्तब झाले होते. २० मध्ये मुशीर सय्यद व सुफी जीन यांच्या पूर्वीच्या प्रभागाची मोडतोड झाल्याने दोघे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे आरक्षणाचा परिणाम फारसा जाणवत नाही.

सिडकोत खुल्या प्रवर्गातील सर्वाधिक प्रभाग आहेत. तेथे मोठी चुरस दिसेल. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, अजय बोरस्ते, अमोल जाधव, सुवर्णा मटाले, रमेश धोंगडे, भाजपचे सतीश सोनवणे, दिनकर आढाव, योगेश हिरे, हिमगौरी आहेर-आडके, माजी महापौर रंजना भानसी, संगीता गायकवाड, उद्धव निमसे, दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, काँग्रेसचे गुरमित बग्गा, हेमलता पाटील, शाहू खैरे, मनसेचे अशोक मुर्तडक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार यांना दिलासा मिळाला.

भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी, शिवसेनेचे प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या जागी महिला आरक्षण पडले. परिणामी त्यांना आता आपल्या राजकारणाचा लागम कुटुंबातील महिलांच्या हाती द्यावा लागणार आहे. आपले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी अशी वेळ अनेकांवर येणार आहे.

दिवे पुन्हा खुल्या प्रवर्गात

प्रभात २२ मध्ये अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने प्रशांत दिवे यांना विस्थापित व्हावे लागेल. त्यांच्या पत्नी प्रणती यांची वर्णी लागणार आहे. २७ मध्ये मात्र त्यांचे बंधू राहुल हे खुल्या गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग २६ मध्ये भाजपचे अंबादास पगारे यांचा प्रभाग महिला राखीव झाल्याने पत्ता कट झाला आहे. प्रभाग २८ मध्ये अनुसूचित जमाती खुला झाल्याने रूपाली निकुळे यांच्याऐवजी यशवंत निकुळे निवडणूक लढवू शकतात. प्रभाग २९ मध्ये एक जागा खुली झाल्याने या जागेवर भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. ४४ मध्ये विद्यमान भगवान दोंदे यांचा प्रभाग महिला जाती गटासाठी राखीव झाल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे, तर प्रभाग ३४ व ३५ दोन्हीमध्ये अनुसूचित जाती गट महिला राखीव झाल्याने राकेश दोंदे अडचणीत आले आहेत. प्रभाग ३४ मध्ये ‘अ’ व ‘ब’ अनुक्रमे अनुसूचित जाती व जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खाडे यांना विस्थापित व्हावे लागणार आहे.

सोडत पथ्यावर

याउलट रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, शरद मोरे, संतोष साळवे यांच्या पथ्यावर रचना पडली. वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार नशीब आजमावू शकणार आहेत. यांच्यासाठी रचना पथ्यावर पडणार आहे. संधी असेल पण राखीव गटात दिग्गज उमेदवारांच्या जागेवर महिलांचे आरक्षण पडल्याने अशा उमेदवारांना सर्वसाधारण गटातून लढण्याची संधी आहे. मात्र, त्यात सर्वसाधारण गटातील उमेदवारांशी लढत देऊन मागासवर्गीय उमेदवारांना निवडून यावे लागणार आहे. हे आव्हान किती जण पेलू शकतात? आरक्षण सोडतीत संधी गमावलेल्या मागासवर्गीय दिग्गज उमेदवारांना त्यांचे राजकीय पक्ष खुल्या गटातून उमेदवारी देणार का, हा प्रश्न कायम राहणार आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT