Raj Thackeray sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MNS on Godavari Pollution : नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा 'तो' संदेश मनसैनिकांनी घेतला मनावर!

Maharashtra Navnirman Sena on environment : प्रयागराज कुंभमेळ्यावरून प्रदूषणाच्या विषयावर राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका मांडली होती.

Sampat Devgire

MNS Nashik News : नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. राजकीय पक्षांपासून ते प्रशासनही गोदावरीच्या प्रदूषणाविषयी चिंतित आहे. मनसेने आता नेमका हाच मुद्दा हाती घेण्याचे निश्चित केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(MNS) गुढीपाडवा मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पारंपारिक राजकारण बाजूला ठेवले. यावेळी त्यांनी प्रयागराज येथील कुंभमेळाबाबत परखड वक्तव्य केले होते. त्यावरून अगदी विरोधकांनीही त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते.

राज ठाकरे(Raj Thackrey) यांनी नद्यांच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. प्रदूषणामुळे नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. बाबत राज्य शासन आणि महापालिका दोन्हीही उदासीन असतात. नद्यांचे प्रदूषण दूर करण्यासाठी हिंदू धर्म आडवा येत असेल तर त्यावरही उपाय करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी नद्यांची स्वच्छता आणि प्रदूषण मुक्तता याबाबतची भूमिका पोटतिडकीने मांडली. ही भूमिका नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषण मुक्ततेसाठी मनसेचे पदाधिकारी काम करणार आहेत. या संदर्भात रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे महत्त्वाची बैठक होत आहे.

गोदावरीचे प्रदूषण आणि त्यात मिसळणारे शहरातील सांडपाणी हा गंभीर प्रश्न आहे. नाशिक महापालिकेने याबाबत सातत्याने वरवरची कामे केली आहे. त्यामुळे सध्या गोदावरी पात्र नाशिक शहरापासून नांदूर मधमेश्वर धरणापर्यंत प्रदूषित झाले आहे. हे पाणी जनावरांनाही पिण्याच्या पात्रतेचे राहिलेले नाही अशी स्थिती आहे.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुसंतांनीही प्रशासनाला गोदावरी प्रदूषण मुक्त करणे हा प्राधान्याचा विषय ठरविण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी प्रदूषणाबाबत विविध उपक्रम आणि प्रकल्प हाती घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद नाशिक शहरात उमटले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोदावरी प्रदूषण मुक्ततेसाठी काय पावले उचलते? काय धोरण ठरवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT